गडहिंग्लजला विद्यार्थी विज्ञान मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला विद्यार्थी विज्ञान मेळावा
गडहिंग्लजला विद्यार्थी विज्ञान मेळावा

गडहिंग्लजला विद्यार्थी विज्ञान मेळावा

sakal_logo
By

51186
गडहिंग्लज : गडहिंग्लज हायस्कूलमध्ये झालेल्या विज्ञान मेळाव्यात बोलताना एच. आर. पाटील. व्यासपीठावर पी. टी. पाटील, विद्या पन्हाळे आदी.

गडहिंग्लजला विज्ञान मेळावा
गडहिंग्लज, ता. १९ : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आणि त्याअंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा झाली. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे त्याचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक पी. टी. पाटील, पंचायत समितीच्या बीआरसीचे एच. आर. पाटील, दयानंद कोरवी, प्रा. विद्या पन्हाळे, प्रा. आनंदा कोकणे, प्रा. जालिंदर दोरुगडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. एच. आर. पाटील, पी. टी. पाटील यांची भाषणे झाली. प्रा. दोरुगडे यांनी स्पर्धेची नियमावली सांगितली. पर्यवेक्षक एस. डी. कांबळे, विज्ञान शिक्षक के. टी. शिवणे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. एम. बी. कुंभार यांनी आभार मानले. दरम्यान, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय स्पर्धा झाली. यामध्ये तालुक्यातील विविध शाळांतून १४ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रांजल सूर्यवंशी (रामलिंग हायस्कूल नूल) हिने पहिला, तर मानसी तांबडे (हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी) हिने दुसरा क्रमांक पटकाविला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97660 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..