सकाळ सेमिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सेमिनार
सकाळ सेमिनार

सकाळ सेमिनार

sakal_logo
By

५११९६

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत आज सेमिनार
हॉटेल सयाजी येथे आयोजन; डॉ. ए. के. गुप्ता, कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर, ता. १९ ः कसबा बावडा येथील डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (स्वायत्त संस्था) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे उद्या (ता. २०) हॉटेल सयाजी येथे आयोजन केले आहे. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सेमिनारमध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता व महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ कुणाल वाय. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
गेल्या ३८ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रसिद्ध आहे. उच्च शैक्षणिक परंपरेच्या या संस्थेला दोन वर्षांपूर्वी स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर नॅक ‘अ’ श्रेणी व एनबीए मानांकन मिळाले आहे. ‘नवभारत’ ग्रुपतर्फे ‘बेस्ट ओटोनॉमस इन्स्टिट्यूट’ म्हणून महाविद्यालयाचा गौरव केला आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळावी व उत्तम अभियंता बनण्याचे स्वप्न सुकर व्हावे या हेतूने सामजिक जबाबदारीतून या महाविद्यालयामार्फत गेली नऊ वर्षे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सेमिनारला दरवर्षी सुमारे १२०० विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभियंता बनून उत्तम करिअरची संधी मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी हा सेमिनार मार्गदर्शक व महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अॅडमिशन सेलचे प्रमुख रवींद्र बेन्नी, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97677 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..