डिकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची निवड
डिकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

डिकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

51192

डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

इचलकरंजी, ता. १९ ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा अहमदाबादमधील अरविंद लिमिटेड कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. सागर मगदूम, अमीर नायकवडी, विजयलक्ष्मी पाटील, पूर्वा पाटील, प्रतीक पाटील व पूर्वा कोरे या विद्यार्थ्यांची निवड केली. अरविंद ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी आहे. भारतातील डेनिम निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीमार्फत ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केला होता. त्यामध्ये रिटर्न टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतांची चाचणी घेऊन उत्तम पॅकेजसह निवड केली. यामध्ये ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, डॉ. एम. वाय. गुडियावर व प्राध्यापकांचे मागदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97679 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..