पान ५ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५ स पटा
पान ५ स पटा

पान ५ स पटा

sakal_logo
By

एफआरपी जाहीर करूनच
हंगामाला सुरुवात करण्याची मागणी
राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामातील एफआरपी जाहीर करूनच गळीत हंगामाला सुरुवात करावी, यासह मागील २०० रुपये आणि ६४ महिन्यांची साखर द्यावी, अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संचालक मंडळाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २०१७ -१८ मधील आलेल्या उसाचे प्रतिटन दोनशे रुपयांप्रमाणे आठ कोटी रुपये थकीत आहेत ते द्यावेत, पुढील हंगाम सुरू करण्याआधी पहिला हप्ता जाहीर करावा. कारखान्याकडून ६४ महिन्यांची सभासदांची सवलतीची साखर व ठेवीवरील व्याज दसऱ्याआधी द्यावे. याची पूर्तता न झाल्यास जनआंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. निवेदनावर जनार्दन पाटील, रंगराव पाटील, विलास पाटील, रावसाहेब डोंगळे, सातापा पाटील, कृष्णात मोगणे, शंकर जाधव आदींच्या सह्या आहेत.

यशवंतराव पाटील 03135
बाळासाहेब सूर्यवंशी 03136

व्हॉलीबॉल असोसिएशनच्या
अध्यक्षपदी यशवंत पाटील
मुरगूड : कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड झाली. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली. यात अध्यक्षपदी यशवंतराव संताजी पाटील (हुपरी), तर सचिवपदी बाळासाहेब सूर्यवंशी (अर्जुननगर, कागल) यांची फेरनिवड झाली.
कार्यकारी मंडळ असे : उपाध्यक्ष बी. डी. सावगावे (कुरुंदवाड), उपाध्यक्ष महादेव कानकेकर (मुरगूड), सचिव बाळासाहेब सूर्यवंशी (अर्जुननगर, कागल),
सहसचिव-सुनील चव्हाण (कुरुंदवाड), खजिनदार- नानासाहेब गाट (हुपरी), सदस्य - शिवाजीराव चोरगे (गारगोटी), अरविंद भोसले (पन्हाळा), नितीन दिंडे (कागल), मारुती काशीद (पन्हाळा), पराग जोशी (पन्हाळा), महेश शेडबाळे (कागल), रोहित नांद्रेकर (जयसिंगपूर), महादेव खराडे (मुरगूड), सुनील कल्याणी (हुपरी), बाळसिंग मिसाळ (कोल्हापूर), सुभाष कागले (हुपरी). यावेळी विलास कालेकर, भालचंद्र आजरेकर, आनंदराव कल्याणकर, संग्राम तोडकर, पप्पू आडनाईक, प्रवीण मोरबाळे, संभाजी मांगले, संजय पाटील, वैभव आडके, योगेश वराळे आदी उपस्थित होते.


राधानगरीत तालुका विज्ञान मेळावा
सरवडे : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व राधानगरी तालुका शिक्षण विभागातर्फे राधानगरी येथे तालुकास्तरावर अखिल भारतीय विज्ञान मेळावा झाला.
मेळाव्यात पंधरा माध्यमिक व तीन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान विकास’ या विषयावर आधारित सर्व विद्यार्थ्यांनी भाषण व सादरीकरणातून विज्ञान विषय मांडला. राधानगरी विद्यालयाची उत्कर्षा उमेश पोवार हिने सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावला.
वेदांत विनायक पाटील याने दुसरा, माध्यमिक विद्यालय मोहडे- चाफोडीची समृध्दी सचिन कांबळे हिने तिसरा, तर नागेश्वर हायस्कूलची तन्वी दत्तात्रय टिपुगडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार होते. समन्वयक अशोक पाटील विषयतज्ज्ञ म्हणून उपस्थित होते.
निवृत्ती गुरव, दीपक पाटील, दीपक पोवार, चव्हाण व विज्ञान संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर धामणे यांचे सहकार्य लाभले. परीक्षक म्हणून एस. आर. पाटील, व्ही. डी. चौगले, डी. एस. चौगले यांनी काम पाहिले.


‘बालक-पालक, स्मार्टफोन’ वर कार्यशाळा
कोल्हापूर : कोष्टी गल्ली येथील तरुण मंडळातर्फे ‘बालक-पालक आणि स्मार्टफोन’ या विषयावर कार्यशाळा झाली.
स्मिता पवार यांनी संवादाची नेमकी गरज स्पष्ट केली. आरोग्य फक्त शरीराचेच नसून, त्याचा मनाशी व अध्यात्माच्या सुदृढतेशी कसा संबंध आहे, हे लक्षात आणून दिले. स्मार्ट फोन मुलांच्या हातात देण्यापूर्वी तपासावा, तो मुले हाताळत असताना त्यांच्या शेजारी बसावे, मुलांनी पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा, गल्लीतील समवयीन मुलांना किमान आठवड्यातून एकदा एकत्र आणावे, त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होईल या दृष्टीने पालकांनी स्क्रीन टाईम कमी करावा, मुलांचे वाचन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, असा कानमंत्रही दिला. अध्यक्ष मधुकर रसाळ, प्रकाश शिगांवकर, प्रोस्टील घोडके, इंद्रजित महाडिक, विनोद भालकर, रोहित सुर्वे, प्रसाद मानकर, आर्यन चिंचणेकर, मयूरेश कांबळे, पार्थ कांबळे, संतोष कांबळे यांनी संयोजन केले. पुष्पा शिगांवकर यांनी स्वागत केले. रुपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पन्हाळा-कोडोली एसटीची मागणी
पन्हाळा ः दोन वर्षांपासून बंद असलेली पन्हाळा-कोडोली ही एसटी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांसह आयटीआयच्या विद्यार्थ्यांतून होत आहे.
पूर्वी कोडोली ते पन्हाळा सकाळी सव्वाआठ, दहा आणि सायंकाळी पाच अशा दिवसांपासून तीन फेऱ्या चालू होत्या. कोडोली, माले, जाखले, पोखले, जाफळे, केखले परिसरांतील लोकांना पन्हाळा येथील न्यायालयात, तहसील कार्यालयात, पंचायत समितीत, कृषी, दुय्यम निबंधक कार्यालयात ये-जा करणे सोयीचे होते. शासनमान्य आयटीआय केंद्र वाघबीळ येथे आहे. यात विद्यार्थी येत असत; पण कोडोली-पन्हाळा ही गाडीच बंद असल्याने या विद्यार्थ्यांसह पक्षकारांची गैरसोय होत असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घेत यावे लागत आहे. कोल्हापूर आगारप्रमुखांनी लोकांचे हाल पाहून बसच्या या फेऱ्या तत्काळ चालू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पाककृती स्पर्धेत साक्षी प्रथम
कोल्हापूर : कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शन लोकेशनल कोर्सेस फॉर वुमनमधील फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटतर्फे आयोजित पाककृती स्पर्धेत साक्षी परमाने हिने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी थीम न्यूट्रिमिलेट कुक ऑफ अशी होती. तृणधान्ये वापरून पौष्टिक व आरोग्यदायी रेसिपी तयार करण्याचे आव्हान विद्यार्थिनींसमोर होते. स्पर्धेत विविध प्रकारच्या पाककृती केल्या होत्या. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे, विभागप्रमुख श्वेता पाटील, डॉ. नीलम जिरगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना चषक व मानपत्र देण्यात आले. संस्थेचे विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे व ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली.

01825
नीरज घाटगे आयटीआयमध्ये राज्यात प्रथम
सेनापती कापशी ः येथील नीरज प्रकाश घाटगे याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) मेकॅनिकल ऑटो बॉडी पेंटिंग या विभागातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. वाळवा (ता. इस्लामपूर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याने शिक्षण घेतले. त्याच्या या यशाने सेनापती कापशी या ऐतिहासिक नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला प्राचार्य एस. आय. भोसले, विभागप्रमुख के. के. पाटील, प्रा. तानाजी पाटील व आई-वडिलांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97689 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..