भगवद्‌गीतेचा अभ्यास सर्वांनी करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवद्‌गीतेचा अभ्यास सर्वांनी करावा
भगवद्‌गीतेचा अभ्यास सर्वांनी करावा

भगवद्‌गीतेचा अभ्यास सर्वांनी करावा

sakal_logo
By

51251

भगवद्‌गीता अभ्यासाचा घेतला ध्यास!
आर. के. नगरमधील अलका कुलकर्णी यांचे घर बनले गीता प्रसाराचे केंद्र

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : इयत्ता पाचवीत शिकणारी अनया कशाळकर नमस्कार ऐवजी ‘मनस्कार’ असे म्हणायची. मुळात वय लहान. नमस्काराचा उच्चार कसा करायचा, हे तिला जमत नसे. आज याच अनयाला भगवद्‌गीतेतील श्‍लोक तोंडपाठ आहेत. सात वर्षे वयाची सिद्धी राजपूतला विष्णुसहस्रनाम, रामरक्षा, हनुमानस्त्रोतांसह २२ श्‍लोक पाठ आहेत. या मुलींचे संस्कृतमधील शब्दांचे उच्चार पाहिले तर थक्क व्हायला होते. ही किमया साध्य करून दिली ती अलका रामचंद्र कुलकर्णी यांनी. आर. के. नगरमधील कुलकर्णी दाम्पत्याचे हे घर म्हणजे भगवद्‌गीतेचे माहेरघर असून, गीतेच्या नामाचा अखंड ज्ञानयज्ञ तिथे सुरू असतो.
रामचंद्र प्रभाकर कुलकर्णी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले. ते मुळचे कोल्हापूरचे. निवृत्तीनंतर दोघेही कोल्हापूरला आले. अलका यांनी वयाच्या ५० व्या वर्षी भगवद्‌गीतेतील श्‍लोक आपणही म्हणावे, तोंडपाठ करावेत, समजून घ्यावेत, असा ध्यास घेतला. आज त्यांचे वय ६७ वर्षे. तेव्हापासून ते आतापर्यंत अलका यांनी भगवद्‌गीता समजून घेतली. भगवद्‌गीतेचा प्रचार, प्रसार करण्याचे ध्येय बाळगून २००९ पासून त्यांनी झोकून दिले. जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगात भगवद्‌गीता मार्ग दाखवते, याचा अनुभव अलका यांचे कुटुंबीय घेत आहेत. ज्यांनी भगवद्‌गीता हाताशी धरली त्यांनाही मार्ग गवसला. श्रीकृष्णाची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे, गीता आहे, असे त्या सांगतात.
अलका म्हणतात, ‘जी मुलं हट्टी आहेत, ज्यांना मोबाईल पाहण्याचा वेड आहे त्यांना माझ्याकडे पाठवा. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला गीतेत मिळेल. प्रत्यक्ष श्रीकृष्ण गीतेबरोबर आहे, याचा अनुभव तुम्हाला येईल. १९८६ मध्ये आर. के. नगरमधील घर बांधले. गीता शिकवण हेच ध्येय मनाशी ठेवलं. लहान मुले, अगदी ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थीही गीताभ्यासासाठी आमच्याकडे येतात. गीता प्रसार कार्यासाठी शृंगेरीच्या शंकराचार्यांकडून मला पुरस्कार मिळाला. मग मी ठरवून टाकले की, जोपर्यंत देह कार्यरत आहे, तोपर्यंत गीतेचा प्रसार करायचा. चिन्मय मिशन स्पर्धा घेते. यासाठी मुलांची तयारी आम्ही करून घेतो. परिसरातील लहान मुले येतात. महिलाही येतात. ज्यांनी कुणी गीतेचा मार्ग अनुसरला त्यांचा मार्ग उजळून निघाला. तुम्हीही घरामध्ये भोजनाबरोबर भजनही म्हणा. घरात संवाद व्हायला हवा.’

चौकट
जीवनाचे आचरणशास्त्र
भगवद्‌गीता, विष्णूसहस्त्रनाम, दासबोध, भागवत, रामरक्षा, मारुती स्त्रोत, ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथांसह अन्य ग्रंथांची माहिती मुलांना दिली जाते. ग्रंथवाचन, नामस्मरणाची गोडी लागावी लागते. ग्रंथ वगैरे गोष्टी म्हणजे म्हाताऱ्यांचं काम आहे, असे समजले जाते. मात्र, तसे नाही. ग्रंथवाचन, स्त्रोत पाठण लहानपणापासून असावे. तीन वर्षांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्यांना भगवद्‌गीता जाणून घ्यायची आहे, त्यांनी कुलकर्णी दाम्पत्यांकडे जावे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97692 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..