यंत्रमागधारक - सूतव्यापारी वादावादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्रमागधारक - सूतव्यापारी वादावादी
यंत्रमागधारक - सूतव्यापारी वादावादी

यंत्रमागधारक - सूतव्यापारी वादावादी

sakal_logo
By

51228

यंत्रमागधारक, सूत व्यापाऱ्यांत वादावादी
सूतभेसळीचा प्रश्न तापला; सूतगिरण्यांकडे पाठपुरावा करण्याची हमी

इचलकरंजी, ता. १९ : सूत भेसळीच्या प्रश्नावरून सूत व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंत्रमाधारक आक्रमक झाले. यावेळी विनय महाजन व शंकर कालिका यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे वातावरण तापले. अखेर बाचक्यावर १०० टक्के सुती धागा अथवा विस्कोसचा वापर याचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत सूतगिरण्यांकडे मागणी करण्यात येईल, अशी हमी सूत व्यापाऱ्यांनी दिली. त्यानंतर वातावरण शांत झाले.
कापसाचा दर वाढल्यामुळे सुतामध्ये भेसळ करण्यास सूतगिरण्यांनी सुरुवात केली आहे. सतामध्ये १०० टक्के सुती धागा वापरणे आवश्यक असताना त्यामध्ये विस्कोस (मानव निर्मित धागे) याचा वापर केला जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवेळी दिसून येत आहे. त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे. कापड व्यापारी व यंत्रमागधारक यांच्यात वादावादी होत आहे. त्यामुळे सूत भेसळीच्या मुद्दा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कालिका यांना निवेदन देऊन चर्चा केली. यामध्ये सूत खरेदी बिलावर, बाचक्यावर व त्यातील प्रत्येक कोनावर १०० टक्के सुती धागा असल्याचा उल्लेख करावा अथवा विस्कोसचा वापर केला असल्यास त्याच्या प्रमाणासह उल्लेख करावा, अशी मागणी केली. सुती धाग्यामध्ये भेसळ आढळल्यास फौजदारी करण्याचा इशारा दिला.
या वेळी यार्न मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंत्रमागधारक आक्रमक झाले. महाजन व कालिका यांच्यात शाब्दीक वादावादीस सुरुवात झाली. यामध्ये कालिका यांनी राजकारण करीत असल्याचा आरोप केल्यानंतर महाजन यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे शाब्दीक वादावादी वाढत गेल्याने तणाव वाढला. काही जणांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले. त्यानंतर बाचक्यावर सूत धाग्याचा उल्लेख करण्याची सूतगिरण्यांकडे मागणी करण्यावर एकमत झाले.
शिष्टमंडळात महाजन, सूरज दुबे, मोहन ढवळे, उमेश लाड, भानुदास वीर, सचिन मांगलेकर, दीपक भांबरे, मनोज दाते, महेश दुधाणे, राहुल चिखलगे, सचिन कांबळे, कपील ढवळे, म्हाळसाकांत कवडे यांचा समावेश होता. कालिका यांच्यासह के. के. जोशी, राजकुमार गोयंका, मनीष हरलालका आदी सूतव्यापारी उपस्थित होते.
----------------
ज्या यंत्रमागधारकांना सुती धाग्यात मानवनिर्मित धागा मिसळून आला असल्यास आपली लेखी तक्रार यंत्रमागधारक जागृती संघटनेकडे करावी.
-विनय महाजन, यंत्रमागधारक नेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97716 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..