संघटना मजबूत करणार, वनकामगारांचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघटना मजबूत करणार, वनकामगारांचा निर्धार
संघटना मजबूत करणार, वनकामगारांचा निर्धार

संघटना मजबूत करणार, वनकामगारांचा निर्धार

sakal_logo
By

संघटना मजबूत करणार
वनकामगारांचा निर्धार; आजऱ्यात बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ : वनकामगारांचे विविध प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वनकामगार संघटना बळकट व मजबूत करणऱ्याची गरज आहे. इथून पुढे संघटना मजबूत करण्यावर भर देऊ, असा निर्धार वनकामगारांनी केला.
सुलगाव रोपवाटिकेमध्ये वनविभागअंतर्गत विविध विभागाच्या वनकामगारांची बैठक झाली. या वेळी विविध विषयावर चर्चा झाली. राज्य वनकामगार संघटनेचे सचिव अॅड. बळवंत पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी आजरा, चंदगड, पाटणे, गारगोटी, कडगाव, शाहूवाडी, पेंडागळे, राधानगरी व गगनबावडा या वनपरिक्षेत्रातील वनकामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजरा तालुकाध्यक्ष मारुती शिंदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात बैठकीचा हेतू विशद केला. सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे असेही सांगितले. अॅड. पवार यांनी संघटनेचे महत्त्‍व स्पष्ट केले. न्यायालयीन लढाई करावीच लागते. त्याशिवाय न्याय मिळत नाही. जे वनकामगार नोकरीत कायम झालेले नाहीत. त्यांच्यासाठी न्यायालयीन लढाई केली जाईल, असे ठरले चिमाजी पाटील यांनी जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लढा उभा केला जाईल, असे सांगितले. उर्वरित कामगारांना नोकरीमध्ये कायम करणे. निवृत्त कामगारांना त्यांचे लाभ मिळवून देणे यांसह विविध मागण्यांवर चर्चा झाली. निवृत्ती चौधरी, सोमा दळवी, संभाजी पोवार, कृष्णा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संजय पानारे, बाळू गावडे, सुरेश पताडे, तुकाराम जाधव, तानाजी गुरव यांच्यासह वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण या विभागातील वनकामगार उपस्थित होते. बुधाजी कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97729 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..