मनपा कारवाई करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा कारवाई करणार
मनपा कारवाई करणार

मनपा कारवाई करणार

sakal_logo
By

जलस्त्रोत्रांच्या ठिकाणी कपडे,
जनावरे धुतल्यास कारवाई

कोल्हापूर, ता. १९ : नागरिक व व्यावसायिकांकडून रंकाळा तलाव परिसर, राजाराम बंधारा, पंचगंगा नदी घाट, तांबट कमान, संध्यामठ परिसर व इतर जलस्त्रोत्राच्या ठिकाणी कपडे, जनावरे धुण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे संबंधितांवर महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नदी व तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयात दावा दाखल असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार नदी व तलाव यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कपडे धुणे अथवा जनावरे धुणे यावर निर्बंध आहेत. तरी रंकाळा तलाव परिसर, राजाराम बंधारा, पंचगंगा नदी घाट, तांबट कमान, संध्यामठ परिसर व इतर जलस्त्रोत्रांच्या ठिकाणी कपडे अथवा जनावरे धुऊ नये. त्यामुळे नदी, तलावांचे संवर्धन व जलप्रदूषण यावर नियत्रंण ठेवता येईल. जलस्त्रोत्रांच्या ठिकाणी कपडे अथवा जनावरे धुतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97779 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..