शिक्षक बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बदली
शिक्षक बदली

शिक्षक बदली

sakal_logo
By

51284

शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी करा
राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाचे प्रशासकांना निवेदन

कोल्हापूर, ता. १९ ः प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी करून त्रुटी ठेवलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, ऑगस्टमध्ये शिक्षकांच्या बदल्या केल्या. शिक्षक संघटनांनी बदल्यांची प्रक्रिया व्यवस्थित होण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही बदल्यांमध्ये काही गंभीर त्रुटी जाणूनबुजून ठेवल्या आहेत. बदली पात्र शिक्षकांच्या याद्यांत सतत बदल केला. बदल्यादिवशी त्या पाहण्यासाठी उपलब्ध नव्हत्या. अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती असतानाही बदली केली. जुलैचा पट विचारात घेऊन कोणत्या शाळेतील शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवायच्या याचा विचार केला नाही. काही शाळांमध्ये काही पदे रिक्त ठेवली आणि त्यावर वशिल्याने अन्य शिक्षकांची सोय केली जात असल्याचे जाणवते. सेमी शाळेतील शिक्षकांना जबरदस्तीने सेमीचेच वर्ग घ्यावे लागले. काही सेमी दाखवल्या नाहीत. त्यामुळे प्रथम सेमी शाळेवर जाण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांना सेमीच्या शाळेवर जायला मिळाले नाही. काही शाळेमध्ये विशेष शिक्षकांच्या जागा मान्य जागेपेक्षा जादा झाल्या आहेत. भाषा विषयाच्या ठिकाणी विज्ञान विषय पाठविले जात आहेत. पट कमी असूनही त्या शिक्षकांची बदली केली जात आहे. आणि तेवढ्याच पटाच्या अन्य शाळेमध्ये अनेक वर्ष कमी शिक्षकावर काम केले जात आहे. महिन्यानंतर पुन्हा स्कॉलरशिप घेणाऱ्या काही ठराविक शिक्षकांना मूळ शाळेत पाठविले जात आहे. बदल्या करताना काही शिक्षकांनी विनंती बदल्या मागितल्या होत्या. त्यामध्ये स्तनदा माता शिक्षिका, काही वयस्कर शिक्षकही होते. पण त्यांची सोय न पाहता काही ठराविक शिक्षकांची सोय केल्याचे दिसत आहे. यामुळे शिक्षकांत असंतोष असून, प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.
सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, युवराज सरनाईक, मनोहर सरगर, किरण पाडळकर, निलेश पवार, मयूर जाधव, सुनील पाटील, वसंत आडके, सुभाष दादवड, तानाजी पाटील, बी. आर. कांबळे, नामदेव मुंडे, राजेंद्र गेजगे, विनोद भोंग उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97782 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..