हद्दवाढ तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढ तोडगा
हद्दवाढ तोडगा

हद्दवाढ तोडगा

sakal_logo
By

51293

दोन्ही बाजूचे एकमत करून
हद्दवाढीबाबत तोडगा काढू

राजेश क्षीरसागर ः हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने घेतली भेट

कोल्हापूर, ता. १९ : हद्दवाढीसाठी प्रस्तावित गावांचा विरोध असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे, दोन्ही समित्यांनी विकासाच्या बाजूने एकत्र यावे, दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून संयुक्तिक समिती स्थापन करू, प्रस्तावित हद्दवाढीचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सकारात्मक तोडगा काढू, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांतील सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री.क्षीरसागर म्हणाले, ‘‘विरोधाला विरोध करून समस्येचा मार्ग निघत नाही. शहराची हद्दवाढ होणे नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच शहराशेजारील गावांचा विकास होऊन शैक्षणिक, वैद्यकीय सेवांसह मूलभूत सोयी सुविधा नागरिकांना मिळाल्या. ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सुटणार आहे. विकास झाल्यास शासनाकडून निधी मंजूर करून गावांचाही विकास व्हावा. ग्रामीण जनतेलाही शहराप्रमाणे मूलभूत सुविधा मिळाव्यात ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीची बाब आहे. विचारांची देवाणघेवाण करून दोन्ही समित्यांची संयुक्तिक बैठक होणे गरजेचे आहे.
समितीचे राजू माने म्हणाले, ‘‘अनेक वर्षे हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. समितीचा विरोध नाही. पण, प्रस्तावित गावातील लोकांची भूमिका समजून न घेता होणाऱ्या हद्दवाढीस विरोध आहे. अनेक गावांनी गाव बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शहरासह गावातील नागरिकांचेही नुकसान होत आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी इतर शहरांचा अभ्यास करून आराखडा सादर करावा.’’
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विभागप्रमुख मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पीयूष चव्हाण, रूपेश इंगवले, हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्ह्त्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97784 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..