एज्युकेशन, स्पोर्टस्‌ न्यूज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशन, स्पोर्टस्‌ न्यूज
एज्युकेशन, स्पोर्टस्‌ न्यूज

एज्युकेशन, स्पोर्टस्‌ न्यूज

sakal_logo
By

जिल्हा डॉजबॉल मुलींचा संघ उपविजयी
कोल्हापूर : राज्य डॉजबाल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धा चिखली (ता. शिराळा, जि. सांगली) येथे झाली. राज्यस्तरीय सबज्युनिअर डॉजबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर डॉजबॉल मुलींचा संघ उपविजयी झाला. विजयी संघातील सर्व खेळाडू गर्ल्स हायस्कूलमधील आहेत. यशस्वी खेळाडू असे : श्रेया जाधव (संघनायक), प्रांजली पाटील, तेजस्विनी सुतार, रसिका एडगे, प्रीती गावडे, पूर्वा कांबळे, मृणाल चव्हाण, प्रणिता खोत, सानवी पवार, सृष्टी शिंदे, अंकिता कांबळे, सबिया फकीर.
विजयी संघाला जिल्ह्या डॉजबॉल असोसिएशनचे सचिव हेमंत वारके यांचे मार्गदर्शन तर श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेचे अध्यक्ष के. जी. पाटील, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एच. एच. गोसावी यांचे सहकार्य लाभले. विजयी संघाला क्रीडा शिक्षिका उज्‍ज्वला देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. राज्य डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष वसंत लुंगे, सांगली जिल्हा डॉजबाल असोसिएशनचे सचिव राजू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेतली.
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97799 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..