स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : छाबडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : छाबडा
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : छाबडा

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : छाबडा

sakal_logo
By

51314
इचलकरंजी : आर्य चाणक्य पतसंस्थेच्या वार्षिक सभेत शिरीष देशपांडे यांचा सत्कार करताना अध्यक्ष जवाहर छाबडा. या वेळी राजेंद्र राशिनकर, पंकज मेहता, सुकुमार देवमोरे, राकेश अग्रवाल, लीलाबाई शिंदे आदी.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
केंद्र सुरू करणार : छाबडा
आर्य चाणक्य पतसंस्थेची वार्षिक सभा
इचलकरंजी, ता. २० : आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात दोन कोटी १५ लाख रुपये नफा झाला आहे. संस्थेतर्फे लवकरच स्वमालकीच्या जागेत ग्रंथालय, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी दिली. संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे सीईओ शिरीष देशपांडे प्रमुख उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, ‘‘शासनाच्या धोरणामुळे पतसंस्थांच्या अनेक योजना बंद कराव्या लागतील का, अशी शंका येत आहे. पतसंस्था या सामाजिक जाणिवेतून उभे राहिल्या आहेत. अशा संस्थांच्यावर बंधने आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे.’’
उपाध्यक्ष राजेंद्र राशिनकर यांनी अहवाल वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार यांनी नोटीस वाचन केले. दत्तात्रय जोशी, नंदकिशोर भुतडा, विनायक राशिनकर, श्रीकांत पोतनीस, श्‍वेता देसाई, जय हारुलगे यांचा सत्कार करण्यात आला. संचालक उदय भागवत, पंकज मेहता, शांतिनाथ शिरगावे, सुकुमार देवमोरे, राकेश अग्रवाल, लीलाबाई शिंदे, प्रकाश गायकवाड, अरविंद कुलकर्णी, पंडित ढवळे उपस्थित होते. अरविंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नरोत्तम लाटा यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97829 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..