सिलाई वर्ल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलाई वर्ल्ड
सिलाई वर्ल्ड

सिलाई वर्ल्ड

sakal_logo
By

सिलाई वर्ल्डमध्ये
दिवाळीची खास योजना
‘प्री दिवाळी - इएमआय शॉपिंगवाली’
कोल्हापूर, ता. १९ ः आपल्या नावीन्यपूर्ण ऑफर्समुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेले सिलाई वर्ल्ड आता दिवाळी शॉपिंगसाठी सुसज्ज झाले आहे. या वेळेसही वस्त्रविश्वात आत्तापर्यंत कोणीही दिलेली नसेल, अशी ऑफर सिलाईने जाहीर केलेली आहे. ‘प्री दिवाळी - इएमआय शॉपिंगवाली’ अशी ही ऑफर असून यामध्ये आत्ता दिवाळी खरेदी करा आणि पैसे ६ महिन्यांत भरा अशी खणखणीत योजना देण्यात आलेली आहे.
इतकेच नव्हे तर यासाठी दिवाळीमध्ये ज्या खास ऑफर देण्यात येतात, त्याही आत्ताच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महिलांना साड्या, ड्रेस, कुर्तीज, गाऊन अशी मोठी खरेदी अत्यंत कमी किमतीत आणि तीही इएमआयद्वारे करता येणार आहे. तसेच पुरुषांना फॉर्मल शर्टस्‌ व कॅज्युअल्स आणि मुलांना किड्सवेअरच्या खरेदीतही हाच लाभ घेता येणार आहे. दिवाळी खरेदीचा हा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांना आपल्या खिशातले पैसे खर्च करण्याची गरज देखील नाही. कारण ही दिवाळी खरेदी ग्राहक त्यांचे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरून करता येणार आहेत. दिवाळी हा आपल्याकडचा मोठा सण आहे. या काळात प्रत्येक घरात मोठी खरेदी केली जात असते. त्यामुळे प्रत्येक घरावर आर्थिक ताणही येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी आणि दिवाळीत कोणतीही तडजोड न करता, मनपसंत कपडे खरेदी करता यावी या उद्देशातूनच आम्ही आत्ताच ही योजना जाहीर करत असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक श्री. सागर गुजर यांनी सांगितले. सिलाई वर्ल्डच्या चौथी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर येथील शोरूमध्ये ही प्री-दिवाळी ऑफर उपलब्ध असून महाराष्ट्रातील ग्राहकांनी त्याचा लाभ घेत मोठी खरेदी करावी, असे आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97851 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..