इस्लामपूर : विवाहिता खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूर : विवाहिता खून
इस्लामपूर : विवाहिता खून

इस्लामपूर : विवाहिता खून

sakal_logo
By

फोटो - सांगली पान १ वरून घेणे............
................

दोन्ही मुलीच झाल्याने
विवाहितेचा खून
इस्लामपुरात प्रकार; महिलेचे माहेर कसबा बावडा

सकाळ वृत्तसेवा
इस्लामपूर, ता. १९ : येथील कोळी मळा परिसरातील सौ. राजनंदिनी सरनोबत यांचा काल विहिरीत बुडून झालेला मृत्यू अपघाती नसून तो खून असल्याचे आज उघडकीस आले. रविवारी (ता. १८) पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला होता. तिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.
राजनंदिनी यां माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (वय २८, रा. रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कौस्तुभला ता. २२ पर्यंत कोठडी मिळाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ३१ मार्च २०१५ ला राजनंदिनीचा कौस्तुभशी विवाह झाला. त्यांना राजलक्ष्मी (वय ७) व संयोगीता (६ महिने) या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. त्यातून तो तिला सतत त्रास देत होता. विवाहातील खर्च न दिल्याचाही राग होता. राजनंदिनीने शिवणकाम करून ही रक्कम फेडली होती. कौस्तुभ बेरोजगार आहे. मात्र तो पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. शनिवारी (१७) रात्री नऊच्या सुमारास राजनंदिनीला आईचा दूरध्वनी आला, त्यावरूनही कौस्तुभने त्रास दिला. स्पीकर फोन सुरूच राहिल्याने माहेरकडील लोकांनी हा त्रास ऐकला होता. रविवारी (ता. १८) पहाटे पाचच्या सुमारास वॉकला जाण्याचा बहाणा करत त्याने तिला दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने नेले. तेथे रस्त्यापासून ४० फूटांवरील एका विहिरीत तिला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.
कौस्तुभने काल मात्र पोलिसांना ती लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. राजनंदिनीच्या नातेवाइकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली होती. उत्तरीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
राजनंदिनी कधीही सकाळी फिरायला जात नव्हती. घरापासून दोन किलोमीटरवर निर्जन रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. तेथेच कौस्तुभच्या चपला पडल्या होत्या.शर्ट मळलेला होता. उजव्या दंडाला खरचटले आहे, असे अनेक मुद्दे फिर्यादीत आहेत. कौस्तुभ शिक्षक दाम्पत्याचा मुलगा आहे. त्याची बहीण पोलिस खात्यात नोकरीस आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97854 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..