क्रीडा- खेलो इंडिया ज्युदो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा- खेलो इंडिया ज्युदो
क्रीडा- खेलो इंडिया ज्युदो

क्रीडा- खेलो इंडिया ज्युदो

sakal_logo
By

51326

खेलो इंडिया ज्युदो स्पर्धेसाठी
पूर्वा, यशस्विनीची निवड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः मेहसाणा (गुजरात) येथे झालेल्या खेलो इंडिया वुमेन्स ज्युदो स्पर्धेत पश्चिम विभागात कोल्हापूर ज्युदो असोसिएशनच्या पूर्वा सोहोनी, यशस्विनी जाधव, साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. पूर्वा आणि यशस्विनी यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. दरम्यान, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दमन-दिव आणि महाराष्ट्र या सात राज्यातून स्पर्धक सहभागी झाले. ज्युदो असोसिएशनतर्फे तिघींचाही अपर्णा पाटोळे यांच्या हस्ते सत्कार झाला.
खेलो इंडिया व ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन तसेच महिलांचा खेळातील सहभाग वाढावा, यासाठी ही स्पर्धा झाली. पूर्वा प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची तर यशस्विनी पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे. दरम्यान, बाबूजमाल दर्गा येथील हॉलवर झालेल्या सत्कार कार्यक्रमावेळी वीरधवल पाटोळे, वृषाली लिंग्रस, संतोष बाबर, अमोल देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97871 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..