ग्रामपंचायतींची घरपटटी पोहोचली १०० कोटींवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतींची घरपटटी पोहोचली १०० कोटींवर
ग्रामपंचायतींची घरपटटी पोहोचली १०० कोटींवर

ग्रामपंचायतींची घरपटटी पोहोचली १०० कोटींवर

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद

ग्रामपंचायतींची घरपट्टी १०० कोटींवर
---
५० टक्‍के खर्च कर्मचारी पगारावरच; नवीन उत्‍पन्‍नाचे पर्याय शोधावे लागणार
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २० : जिल्‍ह्यातील एक हजार २५ ग्रामपंचायतींची घरपट्टी वर्षाला १०० कोटींवर पोचली आहे. पाच-सहा वर्षांपासून भांडवली मूल्यावर कर आकारणी होत असल्याने घरपट्टीची रक्‍कम वाढली. मात्र, प्रत्यक्षात वसुली ही ६० ते ७५ टक्‍के इतकीच होते. यातीलही ५० टक्‍के रक्‍कम ग्रामपंचायत कर्मचारी पगारावरच खर्च केली जाते. कर्मचारी पगारावर ३५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्‍कम खर्च करण्यास परवानगी नाही. मात्र, जिल्‍ह्यातील एकही ग्रामपंचायत या मर्यादेत खर्च करीत नाही. त्यातच महिला बालकल्याण, समाजकल्याण, अपंग कल्याणवरही याच र‍कमेतून खर्च करावा लागतो. गावाच्या विकासाला तोकडी रक्‍कम उपलब्‍ध होत आहे. ग्रामपंचायतींना उत्‍पन्‍न वाढविणे, कराची फेरआकारणी करणे व नियमित करवसुली करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
गावांचा विकास करण्यासाठी शासनाकडून येणारे अनुदान कमी-कमी होत चालले आहे; तर दुसरीकडे गावांची लोकसंख्या, विस्‍तार आणि पायाभूत सुविधांची मागणी वाढत चालली. येणारे उत्‍पन्‍न व होणारा खर्च याचा ताळमेळ घालताना ग्रामपंचायती डबघाईला येत आहेत. गावातील एकेका इमारतीची खरी माहिती घेऊन निवासी, वाणिज्यिक तसेच औद्योगिक इमारतींची वर्गवारी करून, भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गावांत पूर्वापार पद्धतीनुसार आकारणी केली जाते. गावातील पुढारी, धनदांडग्यांच्या इमारतीचे मूल्यांकनही सोयीचे केले जाते. याचा परिणाम उत्‍पन्‍नावर व विकासावर होतो.

....
तालुकानिहाय घरपट्टीची रक्कम
*तालुका *चालू वर्षीची मागणी
*आजरा *२ कोटी २६ लाख ४६ हजार
*भुदरगड *२ कोटी ७० लाख ८४ हजार
*चंदगड *५ कोटी १२ लाख ६७ हजार
*गगनबावडा *९० लाख ४८ हजार
*गडहिंग्‍लज *४ कोटी १ लाख २० हजार
*हातकणंगले *२० कोटी ९८ लाख
*करवीर *२६ कोटी ६० लाख २० हजार
*कागल *७ कोटी १ लाख ९८ हजार
*पन्‍हाळा *६ कोटी ७ लाख १५ हजार
*राधानगरी *४ कोटी ३० लाख ४९ हजार
*शाहूवाडी *४ कोटी ४० लाख २२ हजार
*शिरोळ * १२ कोटी ७५ लाख ९० हजार
---------------------------------------------------
एकूण ९९ कोटी १५ लाख ५९ हजार
...

गावातील प्रत्येक कुटुंबनिहाय घरफाळ्याची माहिती फलकावर जाहीर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणाचा घरफाळा किती, कमी आहे की जास्‍त, घरफाळा आकारणीचे सूत्र मांडणे आवश्यक आहे. यामुळे घरफाळा वाढ होण्यास मदत होईल. तसेच, ग्रामपंचायतींनीही आता उत्‍पन्‍न वाढीसाठी प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. अनुदानाची वाट न पाहता वेगवेगळे प्रयोग राबविल्यास ग्रामपंचायती अधिक सक्षम व आत्‍मनिर्भर होतील.
- अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97888 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..