राज्य उत्पादन शुल्क विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य उत्पादन शुल्क विभाग
राज्य उत्पादन शुल्क विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभाग

sakal_logo
By

51434

भोगावती परिसरात
३६ लाखांचा मद्यसाठा जप्त

बेकायदेशीर वाहतूक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेंपो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने सापळा लावून पकडला. त्यामधील ३६ लाख ६९ हजारांच्या मद्यासह टेंपो पथकाने जप्त केला. याप्रकरणी संशयित नितीश रमेश तांबोसकर (वय ३३, ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे दुय्यम निरीक्षक रणजित यवलुजे यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, उपायुक्त बी. एच. तडवी आणि निरीक्षक एस. जे. डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पथकाने काल भोगावती गावाच्या हद्दीत छापा टाकला. टेंपोतून मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या संशयित नितीशला ताब्यात घेतले. पथकाने टेंपोतून ३६ लाख ६९ हजार रुपये किमतीचे ५१२ बॉक्स आणि १० लाख रुपये किमतीचा टेंपो जप्त केला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक रणजित येवलुजे, अंमलदार विलास पवार, संदीप जानकर, शंकर मोरे, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97973 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..