संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

बी. जी. एम. ग्रुप प्रथम
कोल्हापूर ः मनस्वी महिला मंच आयोजित झिम्मा-फुगडी स्पर्धेत शिवाजी पेठेतील बी. जी. एम. ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. कोल्हापूर संस्कृती यांनी द्वितीय क्रमांक, तर राधेय ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. उद्‌घाटन मराठी चित्रपट व नाटक क्षेत्रातील विकास पाटील यांच्या हस्ते झाले. घागर घुमविणे, उखाणे, फुगडी, सूप नाचवणे, काटवटकणा, घोडा-घोडा या स्पर्धा झाल्या. संस्थापिका शिल्पा कुपटे, स्मिता सावंत, रूपाली जाधव, अभिजित पवार, प्रियांका पाटील, मनीषा इंगवले, स्नेहल कारेकर, स्वरा माने, पूनम चोपडे, अंजना तुंगे, शुभांगी माने उपस्थित होते.
-
रूपा वायदंडे यांचा सत्कार
कोल्हापूर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रूपा वायदंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार (ता. २४) दुपारी तीन वाजता शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम होईल. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार होईल. प्रा. शहाजी कांबळे, मंगल माळगे, उत्तम कांबळे, कुमार कांबळे, शिवाजी आवळे उपस्थित राहतील. प्रा. डॉ. विजय काळेबाग व प्रा. डॉ. शरद गायकवाड मार्गदर्शन करतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98013 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..