बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

बाजार समिती फोटो


बेकायदेशीर कारभाराला अभय देण्याच्या प्रयत्न
बाजार समितीला प्रशासकाची प्रतीक्षा ः भरती, गाळे बांधकाम, अतिक्रमणाला चाप लावणार कोण?

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नवीन संचालक मंडळ अस्तित्वास येण्यास चार महिने लागणार आहेत. अशा स्थितीत समितीचा कारभार सचिव चालवत आहेत. त्यांना अनेक कायदेशीर अडचणी आहेत. हीच संधी साधून काही राजकीय मंडळींनी बेकायदेशीर नोकरभरती, गाळे बांधणी व वाढती अतिक्रमणे अशी नियमबाह्य कामे नियमित करण्यासाठी पडद्यामागून हालचाली चालवल्या आहेत. त्यासाठी मातब्बर नेत्यांनाही साकडे घालत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी किमान चार महिन्यांसाठी प्रशासक नियुक्ती आवश्यक आहे.
मागील संचालक मंडळाने बाजार समितीत नोकर भरती केली. त्यासाठी राज्यभरातून आलेले साडेचार हजारांवर अर्ज बाजूला ठेवून नात्यातील, मर्जीतील उमेदवारांना नोकरी दिली. त्यामुळेही नोकर भरती बेकायेदशीर असल्याच्या तक्रारी झाल्या. चौकशीत ही बाब उघड झाली.
त्यानंतर बाजार समितीच्या आवारात १६ गाळे बांधण्यासाठी एका वजनदार संचालकाने पुढाकार घेतला. १६ व्यापाऱ्यांकडून गाळ्यांसाठी अनामत रक्कम घेऊन गाळे भाडेतत्त्वावर देण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी निश्‍चित केलेली जागा रस्‍त्यालगतची आहे. याबाबत जिल्हा निबंधकांकडे तक्रार झाली. चौकशी झाली, यात नोकरभरती व गाळे बांधकाम बेकायदेशीर असल्‍याचे उघड झाले. त्यानंतर समितीवर आलेल्या प्रशासक मंडळाने नोकर भरती, गाळे व अतिक्रमणे या तिन्ही बाबींना कायदेशीर पळवाटांचा आधार घेत अभय दिले. परिणामी, समितीला १९ कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. महिन्यान्याला सहा लाखांचा बोजा पडतो.
हे वेतन बाजार समिती कोणत्या खात्यातून अदा करते?, त्या खात्यात पैसे येतात?, हा प्रश्न आहे. अशीच स्थिती गाळे बांधकामांची आहे, गाळे बांधण्यासाठी अनामत रक्कम ज्या संचालकांनी घेतली ते संचालक सध्या समितीत नाहीत. त्या गाळ्यांचे भाडे वसुली होते, ते पैसे कोणत्या खात्यात जमा होतात?. गाळे बांधणीचा खर्च कोणी कोणत्या खात्यातून केला? या बाबी गुलदस्त्यात आहे. अशा स्थितीत बाजार समितीवर सचिव कारभार संभाळतात. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत.

भरतीतील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवावे. तसेच त्यांना वेतनही बाजार समितीने द्यावे, असा प्रयत्न दोन माजी संचालकाकडून सुरू आहे. जे गाळे बांधले, त्‍यावर महापालिका नियमानुसार बांधकामावर कारवाईचा बडगाही उगारला जाऊ शकतो. तशा हालचाली सुरू झाल्या. मात्र, जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांच्या निरोपावरून ही कारवाई थांबली आहे. यात गाळे भाड्याने घेतलेल्या व्यापाऱ्यांत अस्वस्थता आहे. तर समिती आवारात अतिक्रमणे आहेत. वर्षभरात विस्तार झाला. त्याला कोणीची अडवले नाही. या बेकायदेशीर बाबी पाहता प्रशासक नियुक्ती करून बेकायदेशीर कारभाराला चाप लावणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98023 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..