इचलकरंजीत १५० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवाना आवश्यक नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत १५० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवाना आवश्यक नाही
इचलकरंजीत १५० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवाना आवश्यक नाही

इचलकरंजीत १५० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवाना आवश्यक नाही

sakal_logo
By

इचलकरंजीत १५० चौरस मीटरपर्यंत
बांधकाम परवाना आवश्यक नाही
प्रशासक देशमुख; अनेक मिळकतधारकांना दिलासा
इचलकरंजी, ता. २० : शहराचा विस्तार होत असल्याने मोठ्या प्रमाणात निवासी बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी बांधकाम परवाना अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हा परवाना प्राप्त करताना मिळकतधारकांना विविध अडचणी येत असतात; पण यापुढे शहरातील १५० चौरस मीटर क्षेत्रापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी महापालिकेकडील बांधकाम परवाना आवश्यक नाही, अशी माहिती महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिली.
नोंदणीकृत अभियंत्यांच्या माध्यमातून जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे, रेखांकन नकाशा, बांधकाम नकाशा, नोंदणीकृत अभियंत्यांचे बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीशी सुसंगत असलेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर विकास शुल्क, उपकर इत्यादी आवश्यकतेनुसार शुल्क महापालिकेकडे ऑनलाईन भरल्यानंतर तयार होणारी पावतीच बांधकाम परवानगी समजण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच १५० ते ३०० चौरस मीटर क्षेत्रापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी अर्जासोबत सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महापालिकेकडून १० दिवसांत आवश्यक ते शुल्क भरण्याबाबत कळविण्यात येणार आहे. हे शुल्क भरल्यानंतर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रकरणी कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही. या प्रक्रियेमुळे बांधकाम परवाना प्रक्रियेत अधिक सुलभता येणार असल्याने संबंधित मिळतधारकांना दिलासा मिळणार आहे.
-------------
कोट
बांधकाम परवाना देण्याच्या नव्या निर्णयामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. तसेच शहराचा विकास आणि विस्तारीकरण झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.
- सुधाकर देशमुख, प्रशासक, महापालिका
-------
एक दिवसांत मिळणार परवाना
बांधकाम परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना किमान ३० दिवसांची वाट पाहत बसावी लागत होती. तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास हा कालावधी वाढत होता. त्यामुळे यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत होती. आता मात्र या नव्या नियमावलीमुळे एका दिवसांत बांधकाम परवाना मिळणार आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रासाठी बांधकाम परवाना काढणाऱ्यांची संख्या ४० टक्के इतकी आहे. त्यांची या किचकट प्रक्रियेतून सुटका होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98050 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..