१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

विचार प्रेरित करणारे
‘सकाळ’च्या (ता. १३ सप्टेंबर) संपादकीय पानावरील ‘मतमतांतरे’मधील सर्वच वाचकांनी मांडलेले विचार प्रत्येकाला दैनंदिन जीवनात कृती करण्यास प्रेरित करणारे आहेत. त्यातून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण दिसते, तसेच प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन त्यावर योग्य उपायही सुचविले आहेत. उदा. १) गटारात घनकचरा टाकल्याने सांडपाणी तुंबते, डासांची पैदास होते. दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होतो, पावसाळ्यात पाणी तुंबून इमारतीत पाणी शिरल्याने सांपत्तिक नुकसान होते. २) अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाचे स्वतंत्र मीटर नसल्याने अनिर्बंध पाणी वापरले जाते. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. ३) कुठेही सार्वजनिक जागेत थुंकू नये, घंटागाडीचा वापर करायला हवा. अशा सवयी स्वतःपासून लावून घेण्याची आता नितांत गरज आहे. मनुष्यबळ, निधी वापर कमी करण्यासाठी शासनाचाही हातभार लागणार आहे.
माणिक यादव, कोल्हापूर

आरोप, समर्थन करताना वास्तवाचे भान गरजेचे
लोकशाहीचा आदर आणि मान-सन्मान राखणाऱ्या आपल्या खंडप्राय देशात अलीकडच्या काळात प्रमुख राजकीय पक्ष आणि विरोधकांमध्ये काही प्रमाणात तथ्य असलेल्या व तथ्यहीन बाबींबाबत परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच न्यायप्रविष्ट असलेल्या बाबींबाबतही समर्थन करून जनतेचे लक्ष विचलित करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे, ही लोकशाहीची शोकांतिकाच मानावी लागेल. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताना कोणी त्यामागील सत्य काय, कारण काय याचा विचार करीत नाहीत. कारणमीमांसाही शोधत नाहीत. एखाद्या बाबीचे समर्थन करताना न्यायप्रविष्ट गोष्टीची पडताळणी व शहानिशाही करीत नाहीत. त्यामुळे जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा या गोष्टींना अलीकडच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. जनमताचा आदर आणि लोकशाहीचा मान-सन्मान राखण्यासाठी राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी आरोप-प्रत्यारोप करताना एखाद्या प्रकरणी न्यायप्रविष्ट बाबींबाबतही समर्थन करताना किमान वास्तवाचे भान ठेवावे, असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.
बाळासाहेब खोत, सांगलीवाडी (जि. सांगली)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98059 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..