डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

sakal_logo
By

डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
गडहिंग्लज, ता. २० : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व चंदीगडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयटीटीटीआर) च्या संयुक्त विद्यमाने शिंदे इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची सुरवात करण्यात आली.
या प्रोग्रॅममध्ये आऊटकम बेस्ड एज्युकेशन या कोर्सचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी विभागातील सर्व शिक्षकांचा सहभाग आहे. अध्यापन पद्धती कशी असावी, विद्यार्थी कौशल्य व क्षमता विकास उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. उपक्रमात प्रा. बी. एस. हेब्बाळे समन्वयक असतील. हा कोर्स आणण्यासाठी सचिव स्वाती कोरी, प्र. प्राचार्य प्रा. के. एस. जोशी, टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. ए. एस. शेळके यांचे योगदान लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98060 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..