सभासद शेतकऱ्यांमुळेच ‘शाहू’च्या यशाची शिखरे, समरजित घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासद शेतकऱ्यांमुळेच ‘शाहू’च्या यशाची शिखरे, समरजित घाटगे
सभासद शेतकऱ्यांमुळेच ‘शाहू’च्या यशाची शिखरे, समरजित घाटगे

सभासद शेतकऱ्यांमुळेच ‘शाहू’च्या यशाची शिखरे, समरजित घाटगे

sakal_logo
By

51526
गडहिंग्लज : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या सत्कारप्रसंगी राजेंद्र तारळे, विठ्ठल पाटील आदी.
--------------------

सभासद शेतकऱ्यांमुळेच
‘शाहू’च्या यशाची शिखरे
---
समरजित घाटगे; कारखान्याला पुरस्काराबद्दल गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : सभासद शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेल्या विश्‍वासामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवीन नवीन शिखरे पार करीत आहे, अशी कृतज्ञता शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी व्यक्त केली.
येथील भाजप शहर कार्यालयात श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. घाटगे यांचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, मारुती राक्षे, संदीप नाथबुवा, प्रीतम कापसे, अजित जामदार आदींसह शेतकऱ्यांच्या हस्ते घाटगे यांचा सत्कार झाला. दरम्यान, शहरासह गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांनी श्री. घाटगे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
घाटगे म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यात आदर्श व्यवस्थापन प्रणाली घालून दिली आहे. त्यानुसार संचालक मंडळ विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करते. त्यास शेतकऱ्‍यांकडून साथ मिळते. व्यवस्थापन, प्रशासन व सभासद शेतकरी यांच्या एकमुखी कारभारामुळेच शाहू कारखाना यशस्वी झाला आहे.
शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांचेही भाषण झाले. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉ. अनिता चौगुले, शहराध्यक्षा नीलांबरी भुईंबर, अर्चना रिंगणे, द्राक्षायणी घुगरी, सोनाली घुगरी, प्रवीण माळी, अण्णासाहेब पाटील (खातेदार), संग्राम आसबे, अभिनंदन पाटील, शैलेंद्र कावणेकर, युवराज बरगे, वामन बिलावर, चंद्रकांत सावंत, प्रीतम कापसे, विठ्ठल भमानगोळ, दिगंबर विटेकरी, भीमराव कोमारे, वरूण गोसावी, सतीश हळदकर, शिवराज खापरे, शिवराज शिंदे, कुमार पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98061 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..