माशांची चंगळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माशांची चंगळ
माशांची चंगळ

माशांची चंगळ

sakal_logo
By

51487
कोल्हापूर : सुरमई, पापलेट घेण्यासाठी झालेली गर्दी. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्र सेवा)

सुरमई, बांगड्यांमुळे चंगळ
समुद्री मासे स्वस्त; तळ कोकणातून मोठ्या प्रमाणात आवक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : दोन दिवसांपूर्वी सुरमईचा दर ७०० रुपये किलो होता. आज हीच सुरमई ५०० रुपये किलोपर्यंत आली. बाकीच्या समुद्री माशांचीही आवक वाढल्यामुळे दर कमी झाले. आज सायंकाळी साडेचार ते पाचनंतर मासे घेण्यासाठी गर्दी झाली होती. समुद्री माशांबरोबरच नदी, तलावांतील माशांचीही मोठी विक्री झाली. उद्या बुधवार असल्याने मासे घेण्यासाठी जास्त गर्दी होईल, असे मासे विक्रेत्यांनी सांगितले.
याबाबत शैलेश घोटणे म्हणाले, ‘समुद्र किनारपट्टीवरील वादळाचा परिणाम नाही. वातावरण स्वच्छ आहे. परिणामी, सुरमईसह अन्य मासे जास्त प्रमाणात सापडले. ट्रॉलर भरून मासळी समुद्र किनारपट्टीला आली होती. ती मासळी ग्रेडेशन करून तातडीने स्थानिक मार्केटमध्ये पाठविली गेली. जेव्हा सुरमई जास्त सापडते, तेव्हा दर कमी होत जातात. आपल्याकडे कोल्हापूरचे खवय्ये हे कमी काटा असलेल्या माशांना अधिक प्राधान्य देतात. यात सुरमई, पापलेट, हलवा आदी माशांचा समावेश असतो. विशेष म्हणजे, आज समुद्री खेकडा, प्रॉन्स, बांगडा, शिंपलेही अधिक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.’
...
ठळक चौकट
समुद्री माशांचे दर (प्रतिकिलो रुपये)
सुरमई *५००
बांगडा *२००
प्रॉन्स *३००/५००
बोंबील *२६०
मांदेली *१२०/१६०
तारली *१८०
पापलेट *६००/१२००
रावस *३२०
शिंपले *२००
हलवा *६००
खेकडा *२८०.
...
पोटात लावा

51489
ोोकोल्हापूर : नदीच्या खेकड्यांची आवक वाढली आहे.

खेकड्यांचीही आवक मोठी
काळ्या पाठीच्या खेकड्यांचीही मोठी आवक झाली. प्लास्टिकचे पोते, बांबुची बुट्टी अन्‌ प्लास्टिक टब घेऊन विक्रेत्यांनी खेकडे आणले होते. एरव्ही २५०/३०० रुपयांना पाच ते सात खेकडे दिले जातात; मात्र आज १०० रुपयांना १०/१२ नग दिले जात होते. खेकडे घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लहान, मोठे अशा आकाराचे, मोठी नांगी अन्‌ लहान नांगी अशा प्रकाराचे खेकडे दिसत होते. काही विक्रेत्यांकडून तिथेच खेकड्यांची नांगी काढून, पाठ सोलून, खेकडा स्वच्छ करून दिला जात होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98069 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..