पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

इचलकरंजी महापालिकेच्या
सात कर्मचाऱ्यांना दंड
शिस्तभंगप्रकरणी कारवाई ः प्रशासक देशमुख यांचा आदेश

इचलकरंजी, ता. २० ः शिस्तभंगाच्या कारवाईखाली महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यात तृतीय श्रेणीतील पाच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार, तर चतुर्थ श्रेणीतील दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड केला. याबाबतचा आदेश प्रशासक सुधाकर देशमुख यांनी दिला. याबाबत भरारी पथकाने कारवाईचा प्रस्ताव दिला होता. अशाप्रकारे प्रथमच कारवाई केल्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
महापालिका झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी प्रशासक देशमुख यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. यात कार्यालयात वेळेत न येणे, हालचाल रजिस्टरला नोंद न करता कार्यालय सोडणे, गणवेश न वापरणे अशा विविध कारणांसाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भरारी पथकाच्या पाहणीत सात कर्मचाऱ्यांनी शिस्तभंग केल्याचे समोर आले होते. त्यावर निर्णय घेत दंडात्मक कारवाईचे आदेश प्रशासक देशमुख यांनी दिले आहेत. यामध्ये तृतीय श्रेणीतील पाच जणांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण विभाग, कर, लेखा, आरोग्य व बारनिशी विभागातील हे कर्मचारी आहेत, तर चतुर्थ श्रेणीतील दोघांवरही कारवाई केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98077 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..