अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली
अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली

अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली

sakal_logo
By

अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली
---
गडहिंग्लजमधील पाऊस; टप्प्याटप्प्याच्या पावसाने महापुराचे गांभीर्य जाणवले कमी
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : यंदा जुलैपासून प्रत्येक महिन्याला पाऊस झाला. परंतु, तो टप्प्याटप्प्याने झाला. यामुळे महापुराची गंभीर परिस्थिती यंदा उद्‍भवली नाही. विशेष म्हणजे यंदा तालुक्याच्या पावसाची सरासरी ६० मिलिमीटरपेक्षा अधिक गेलेली नाही. अतिवृष्टी नसली तरी तालुक्याची सरासरी मात्र पावसाने ओलांडली आहे. तालुक्यातील काही अपवादात्मक बंधारे वगळता सर्व मार्ग यंदाच्या पावसाळ्यात खुले राहिले.
गडहिंग्लज तालुक्यात अलीकडील चार वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. २०१९, २०२०, २०२१ या तिन्ही वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी, हिरण्यकेशी व घटप्रभा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली. नदी आणि ओढ्याकाठच्या घरासह शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. या तिन्ही वर्षी अतिवृष्टीने उच्चांक गाठला होता. या तुलनेत यंदाचा पाऊस झाला खरा. पण, तालुक्यात एकाही दिवशी सरासरी ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. जून कोरडा गेला. जुलैमध्ये पाऊस झाला, तोही पडू काय नको असाच होता. नेहमी जुलैमध्ये अतिवृष्टी व्हायची. परंतु, यंदा एकदाही अतिवृष्टी झाली नाही. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही असाच पाऊस झाला. या महिन्यात पाऊस जोरदार झाला, तरीही अतिवृष्टी झाली नाही. यापूर्वीच्या तिन्ही वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये महापूर येऊन गेला. यंदा मात्र गणेशोत्सवानंतर कोकण व आजरा पट्ट्यातील जोरदार पावसाने या महिन्यात कधी नव्हे, तो पहिल्यांदा महापूर आला. याबाबत जुनी जाणती मंडळी आश्‍चर्यही व्यक्त करीत आहेत.

चौकट...
तीनच बंधारे पाण्याखाली
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसाने महापूर आला. या प्रत्येक पावसात निलजी, ऐनापूर व गोटूर हे तीनच बंधारे पाण्याखाली गेले. ऑगस्टमधील पावसाने भडगाव व जरळी बंधारा मात्र एकच वेळ पाण्याखाली गेला. फार दिवस महापुराची परिस्थिती टिकली नसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

तीन मंडलमध्ये अतिवृष्टी
यंदा केवळ सप्टेंबरमधील पावसातच नेसरी, महागाव व गडहिंग्लज या तीन मंडलात अतिवृष्टी झाली. अगोप पेरणी केलेल्या सोयाबीनला सप्टेंबरमधील पाऊस दणका देणारा ठरला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उघडीप मिळाल्यावर असे शेतकरी मळणीच्या कामात व्यस्त आहेत. अतिवृष्टीची नोंद असेल तेथे नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून भरपाई शक्य असल्याचे सांगण्यात येते.

पाऊस दृष्टिक्षेपात
- तालुक्याची सरासरी : ७८४ मि.मि.
- २०१८ : ७२१ मि.मि.
- २०१९ : १५३६ मि.मि. (केवळ दहा दिवसांत ६३४ मि.मि.)
- २०२१ : १३०३ मि.मि.
- २०२२ : ९५५ मि.मि. (२० सप्टेंबरपर्यंत)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98098 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..