समाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर
समाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर

समाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर

sakal_logo
By

51506
आजरा : येथील माजी सैनिक पतसंस्थेतर्फे आयोजित रौप्यमहोत्सव कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. यावेळी अन्य मान्यवर.

समाजाला दिशा देण्याचे
काम करा : आबिटकर
माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ : समाज राजकीय, सामाजिक दृष्टीने ढवळून निघाला आहे. त्यामुळे समाजाला शिस्त लावण्याचे व दिशा देण्याचे काम आजी-माजी सैनिकांनी करावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील माजी सैनिक व विधवा वीरपत्नी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव झाला. यावेळी आमदार आबिटकर बोलत होते. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, निवृत्त कर्नल विलास सुळकुडे प्रमुख उपस्थित होते.
आबिटकर म्हणाले, ‘समाजात सैनिकांचे वेगळे स्थान आहे. देशाचे संरक्षण ते करत असतात. समाजाची सेवादेखील ते करतात. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे.’ चराटी म्हणाले, ‘सैनिकांबद्दल समाजातील सर्वांनीच आदर ठेवायला हवा.’ डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, ‘सैनिक कर्तव्यच बजावत आला आहे. त्याचे हित जोपासणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.’ शिंपी यांचेही मनोगत झाले. यावेळी आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष विलास गुरव, संभाजी सावंत, संचालक गोपाळ जाधव, गोविंद केरकर, दत्तात्रय मोहिते, दिनकर पाटील, एकनाथ पाटील, गोपाळ बुवा, रंजना जाधव, सुशिला शेंद्रेकर, गोविंद निउंगरे, मारुती फडके, आनंदा कांबळे उपस्थित होते. शंकर पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी पारळे व व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक गंगाधर पाकले यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98105 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..