निवृत्त करणार उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त करणार उपोषण
निवृत्त करणार उपोषण

निवृत्त करणार उपोषण

sakal_logo
By

नारायणकर यांचे
आजपासून उपोषण
कोल्हापूर, ता. २० ः आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ दिला नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील कर्मचारी गणेश नारायणकर बुधवारपासून (ता. २१) शिक्षण मंडळाच्या दारात बेमुदत उपोषण करणार आहेत. ते ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
समितीकडील अनेक पात्र कर्मचाऱ्यांना दोन्ही टप्प्यावरील आश्‍वासित प्रगती योजना लागू केलेली नाही. ५० हून अधिक पात्र कर्मचारी आहेत. साडेपाच वर्षांपासून ते वंचित आहेत. त्यासाठी नारायणकर मंडळाच्या कार्यालयात बेमुदत उपोषण करणार आहेत. पात्र कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने व फरकाच्या रकमेसह योजनेचा लाभ द्यावा. तसेच दप्‍तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून शिस्तभंगाची कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98148 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..