गायींचे लसीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायींचे लसीकरण पूर्ण
गायींचे लसीकरण पूर्ण

गायींचे लसीकरण पूर्ण

sakal_logo
By

शहरातील गायवर्गीय
जनावरांचे लसीकरण पूर्ण

कोल्हापूर, ता. २० ः शहरातील १२९७ भटक्या व पाळीव गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
भटक्या १३३ जनावरांना लस दिली असून, लाल रंगाची खूण केली आहे. लम्पी हा आजार गाय, वासरू व बैल या जनावरांना संक्रमित झाला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व महापालिकेमार्फत शहरातील गायवर्गीय जनावरांचे लसीकरण केले आहे. यासाठी पाच टीम तयार केल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रवींद्र वडगावे, डॉ. किरण उनवणे, डॉ. प्रवीण नाईक, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. जनावरे पाणवठ्यावर, रस्त्यावर अथवा चरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सोडू नयेत. अजूनही कोणाच्या गायवर्गीय जनावरांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98154 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..