कामे पूर्ण करा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामे पूर्ण करा, अन्यथा आंदोलन
कामे पूर्ण करा, अन्यथा आंदोलन

कामे पूर्ण करा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

51540
इचलकरंजी : अपर तहसिलदार शरद पाटील यांना निवेदन देतांना राहूल खंजीरे, राजन मुठाणे, बाबासो कोतवाल आदी.

कामे पूर्ण करा, अन्यथा आंदोलन
‘संगानियो’ समिती अध्यक्ष खंजीरेंचा इशारा; अपर तहसिलदार पाटील यांना निवेदन
इचलकरंजी, ता. २० : संजय गांधी निराधार योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना अद्याप लाभार्थी आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना आदेश वाटप करावे, २८ फेब्रुवारी २२ आणि ३१ मार्चच्या योजना समितीने निश्‍चित केलेल्या लाभार्थ्यांची अनुदान मागणी त्वरीत करावी, अन्यथा मनमानी कारभारा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इचलकरंजी शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिला. याबाबतचे निवेदन खंजीरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर तहसिलदार शरद पाटील यांना दिले आहे.
योजना समितीच्या २८ फेब्रुवारी आणि ३१ मार्चच्या बैठकीत निश्‍चित केलेल्या लाभार्थ्यांना आदेश वाटप सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अशा पद्धतीने काम सुरू राहिल्यास लाभार्थ्यांची अनुदान मागणी करण्यास विलंब होऊन प्रत्यक्षात अनुदान प्राप्त होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच ३० जुन २०, ४ फेब्रुवारी आणि १२ जुलै २१ च्या बैठकीत निश्‍चित केलेल्या काही लाभार्थ्यांनाही अद्याप आदेश वाटप झाले नाही. महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त झालेल्या आमच्या समितीतर्फे झालेल्या बैठकीमधील आदेश वाटप कार्यालयामार्फत चालू आहे. आदेश मिळावा म्हणून लाभार्थी हेलपाटे मारत असले तरी त्यांची दखल घेतली जात नाही.
या पार्श्‍वभूमीवर आज खंजीरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने अपर तहसिलदार पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. योजनेची प्रलंबित कामे गतीने पुर्ण करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, लाभार्थ्यांचा कॅम्प घेवून त्वरित आदेश वाटप व पोष्ट खातेची नोंद ताबडतोब घेण्यात यावी, लाभार्थ्यांचे अनुदान मागणी त्वरीत करण्यात यावी, नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्यात यावेत, समितीची बैठक त्वरित घ्यावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला. समिती सदस्य बाबसो कोतवाल, सचिन कांबळे, राजन मुठाणे, हारुण खलीफा, सुरज लाड, नागेश शेजाळे, अजित मिणेकर, सुदाम साळुंखे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98159 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..