रस्ते डांबरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते डांबरीकरण
रस्ते डांबरीकरण

रस्ते डांबरीकरण

sakal_logo
By

पालखी मार्गावरील रस्त्यांचे
बारीक खडीने पॅचवर्क करा

व्यापाऱ्यांची मनपा प्रशासकांकडे मागणी


कोल्हापूर, ता. २० ः नवरात्रोत्सवातील पालखी मार्गावरील रस्त्यांचे मोठ्या खडींऐवजी बारीक खडीने डांबरी पॅचवर्क करावे तसेच अंबाबाई मंदिर परिसराची आरोग्य विभागा मार्फत स्वच्छता करावी अशी मागणी महाद्वार व्यापारी असोसिएशन तसेच कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
नवरात्री तसेच दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर विविध सुविधांकरिता व्यापारी असोसिएशनने आज प्रशासकांची भेट घेतली. यावेळी मोठ्या खडींपासून डांबरी पॅचवर्क न करता बारीक खडीचे डांबरीकरण करावे. मंदिर परिसरातील स्वच्छता आरोग्य विभागाकडून तातडीने केली जावी. मंदिर तसेच पालखी मार्गावरील लाईटची व्यवस्था सुसज्ज कराव्यात. मंदिर परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी सकाळी व दुपारनंतर अशा दोन सत्रात दोन पथके तैनात ठेवावीत अशी मागणी केली. प्रशासकांनी त्यानुसार तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात किरण नकाते, राजेश राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98190 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..