पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

५१५७९

शिंगणापूर बंधाऱ्यात
बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू
कोल्हापूर ः शिंगणापूर बंधाऱ्यावर अंथरूण धुण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात बुडाला. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. बोटीच्या सहाय्याने त्या तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, सायंकाळपर्यंत शोधमोहिमेला यश आले नाही. संबंधित तरुण हा जाधववाडी परिसरातील असल्याची परिसरात चर्चा सुरू होती.
----------
दीड लाखाची वीजचोरी
कोल्हापूर ः हातकणंगले तालुक्यात दीड लाखाची वीजचोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसाद दिलीप पाटील, दिलीप पांडुरंग पाटील आणि सचिन सुभाष चौगुले अशी त्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते २२ दरम्यान घडला, अशी फिर्याद महावितरण कंपनीचे सागर हुजरे यांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98221 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..