नवरात्रोत्सव बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव बैठक
नवरात्रोत्सव बैठक

नवरात्रोत्सव बैठक

sakal_logo
By

लोगो- कालच्या टुडे १ सेकंड मेनवरून
---
51789

दसऱ्यातच दिवाळी साजरी करा
पोलिस अधीक्षक बलकवडे; नवरात्रोत्सवात महाद्वाररोड खुला, दुचाकीसह रिक्षाला प्रवेश


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः महापूर, कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला होता. यंदा नवरात्रोत्सवात महाद्वारोड खुला ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर दुचाकीसह रिक्षा वाहतुकीला मुभा दिली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप या मार्गावर बॅरिकेडस् न लावता तो मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी दसऱ्यातच दिवाळी साजरी करावी असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या हॉलमध्ये व्यापाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाचे व्यापारी वर्गांने स्वागत केले.
गेली तीन वर्षे महापूर, कोविड अशा कारणांमुळे सणासुदीच्या काळातील व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. कोविडचे निर्बंध उठले असल्याने यंदाचा नवरोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. मात्र, मुख्य मार्ग खुले नसल्याने त्याचा उपयोग व्यावसायिकांना होत नाही. महाद्वाररोड बंद करू नये, अशी मागणी व्यापारी वर्गांनी उचलून धरली होती. याच अनुषंगाने आज सकाळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दर्शन रांग, भवानी मंडप, महाद्वाररोडची पाहणी केली. त्यानंतर व्यापारी वर्गांसोबत बैठक घेतली.
पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी कोरोना निर्बंध उठल्याने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. व्यापार खंडित होऊ नये यासाठी महाद्वाररोड, भाऊसिंगजी रोड खुला ठेवण्यात येणार आहे. फेरीवाल्यांशी वाद टाळण्यासाठी त्यांचीही बैठक घेण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानाच्या दारातील लोखंडी जाळ्या काढाव्यात, उत्सव काळापुरते वाहन ‘शेअर’ करावे, दुचाकीचा शक्यतो वापर करून कोंडी टाळावी. सर्व घटकांनी मिळून ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, माजी नगरसवेक किरण नकाते, अजित ठाणेकर, बाबा निंबाळकर, जयंत गोसानी......, माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सूचना मांडल्या. तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, ईस्टेट विभागाचे नारायण भोसले, सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रितम ओसवाल, सचिव तेजस धडाम, सदस्य शिवाजी पाटील, अशोक ओसवाल, विजय भोसले, परेश भेदा, मनोज बहिरशेठ आदी उपस्थित होते.

ठळक चौकट
व्यापाऱ्यांच्या सूचना...
*भाविकांना बाजारात सहज पोहचता यावे
*पार्किंगला पर्याय द्या
*महाद्वाररोडवर रिक्षाला परवानगी द्या
*महाद्वार आणि ताराबाईरोडवरील अतिक्रमणे हटवा
*फूल विक्रेत्यासंह रिक्षा थांब्याचे नियोजन करा
-----------
ठळक चौकट
बैठकीतील निर्णय...
*महाद्वाररोड बॅरिकेड्स न लावता ठेवणार खुला
*मार्गावर दुचाकीसह रिक्षा वाहतुकीला मुभा
*छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप मार्ग राहणार खुला
*गर्दीचे ठराविक दिवस वगळून वाहतुकीस परवानगी
*रात्री १० ते सकाळी६ या वेळेतच मालवाहतुकीला मुभा
*गर्दीसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार नियोजनात बदल
*अतिक्रम निर्मुलन मोहिमेस पोलिस बंदोबस्त
*मंदिर परिसरातील मार्गावर पॅचवर्कसह पट्टे मारणार
---
चौकट
शेतकरी संघाच्या इमारतीसाठी प्रयत्न...
उत्सव काळापुरते भवानी मंडप येथील शेतकरी संघाची इमारत मिळावी यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला परवानगी मिळाल्यास भाऊसिंगजीरोडचा प्रश्न अपोआप सुटेल. हा मार्ग उत्सव काळातही खुला ठेवता येईल असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
----
महाद्वाररोडवर सम-विषम पार्किंग...
महाद्वाररोडवर सम-विषम पार्किंगचा प्रयोग प्रायोगितत्त्‍वावर करण्यात येणार आहे. याचे नियोजन शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण करत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98244 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..