गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

औरनाळला वित्तीय साक्षरता कार्यशाळा
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे बँक ऑफ इंडिया चेअर शिवाजी विद्यापीठ, डॉ. घाळी महाविद्यालय व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता कार्यशाळा व बँक खाते उघडण्याचे अभियान उत्साहात झाले. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विजय काकडे यांनी नागरिकांना वित्तीय साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले. डॉ. राजन पडवळ यांनी बँकींग व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले. सरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या प्रोत्साहनाने कार्यशाळा झाली. महिला बचत गट सदस्यांसह प्रा. महेश वंडकर, प्रा. विश्‍वनाथ पाटील, बँक ऑफ इंडिया गडहिंग्लज शाखेचे आयूब शेख, विनायक वर्णे आदींची उपस्थिती होती.
-----------------
51588
कोल्हापूर : चिघळीकर-पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, डॉ. क्रांती सावंत, सोमनाथ साळुंखे, अतुल बहुले आदी.

चिघळीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर व उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. एल. एच. पाटील यांनी लिहिलेल्या शेती व शेतकरीविषयक योजना आणि धोरणांची चिकित्सा-भाग एक या पुस्तकाचे प्रकाशन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापुरात झाले. यावेळी डॉ. क्रांती सावंत, प्रा. सोमनाथ साळुंखे, अतुल बहुले, सागर कांबळे, दयानंद कांबळे, प्रा. विलास कांबळे, प्रा. आदिनाथ कांबळे यांच्यासह फुले-आंबेडकर विद्वत सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------
51589
मुकुंद कांबळे, आण्णासाहेब हरदारे

शिवशाहू पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कांबळे
गडहिंग्लज : येथील श्री शिवशाहू शिक्षक शिक्षकेतर सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद कांबळे (शिवाजी विद्यालय- महागाव) व उपाध्यक्षपदी डॉ. आण्णासाहेब हरदारे (शिवराज महाविद्यालय) यांची निवड झाली. सहायक निबंधक अमित गराडे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ बैठकीत ही निवड करण्यात आली. संचालक राजेंद्र खोराटे, दत्तात्रय परीट, संजय माळी, रतन जाधव, राधिका नाईक, सचिव बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. संचालक प्रल्हादसिंह शिलेदार यांनी आभार मानले.
----------------
माळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा
गडहिंग्लज : येथील गोविंदराव माळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. आर. व्ही नाईक यांनी स्वागत, तर मुख्याध्यापक एस. जे. भांदुगरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, संचालक शंकरराव नंदनवाडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन केले. मुस्कान शेख, आदित्य उंबरे, राम परीट यांनी मनोगत व्यक्त केले. पालक महादेवी उंबरे, शोभा मेथे यांनी सूचना मांडल्या. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. एस. डी. कुराडे यांनी आभार मानले.
-----------------
51590
औरनाळ : नागरिकांना डस्टबिनच्या वाटपप्रसंगी विद्याधर गुरबे, संदीप पाटील, प्रशांत देसाई, मलगोंडा पाटील, शिवाजी सावंत आदी.

औरनाळला ४०० डस्टबिनचे वितरण
गडहिंग्लज : पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून माजी उपसभापती विद्याधर गुरबे व इंदुताई नाईक यांना मिळालेल्या निधीतून औरनाळ गावात ४०० डस्टबिनचे वाटप करण्यात आले. गुरबे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य प्रशांत देसाई, राहुल शिरकोळे, मलगोंडा पाटील, औरनाळचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच शिवाजी सावंत, ग्रामसेविका सुजाता बरगाले, सचिन मोरे, मयूर चौगुले, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, कर्मचारी उपस्थित होते.
------------------
गडहिंग्लजला शनिवारी गायनाचा कार्यक्रम
गडहिंग्लज : गायक स्व. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील एस. पी. बालसुब्रमण्यम फॅन्स क्लबतर्फे शनिवारी (ता. २४) त्यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. नगरपरिषदेच्या शाहू सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. संगीताच्या माध्यमातून बालसुब्रमण्यम यांना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम होत आहे. यामध्ये दीपक चौगले, हर्षदा परीट, प्रतिक्षा कांबळे, जितेंद्र कामत व इंद्रजित बंदसोडे गाणी सादर करतील. इंद्रजित बंदसोडे व जितेंद्र कामत यांनी संयोजन केले आहे. नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे सूत्रसंचालकाची भूमिका बजावतील. शहर परिसरातील संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98245 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..