‘रोटरी’तर्फे गणराया ॲवॉर्ड प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रोटरी’तर्फे गणराया ॲवॉर्ड प्रदान
‘रोटरी’तर्फे गणराया ॲवॉर्ड प्रदान

‘रोटरी’तर्फे गणराया ॲवॉर्ड प्रदान

sakal_logo
By

51594
------------
‘रोटरी’तर्फे गणराया ॲवॉर्ड प्रदान
इचलकरंजी, ता. २१ : कलानगर महागणपती मंडळ कलानगर, गांधी कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धार ग्रुप रिंगरोड, यशवंत गणेशोत्सव मंडळ खंजिरे मळा व विश्‍वशांती मित्र मंडळ भोनेमाळ यांना २०२२ चा गणराया अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित केले. रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे, प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश सातपुते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
गणराया अ‍ॅवॉर्ड निरीक्षक कमिटीचे बाळासाहेब देवनाळ, रामचंद्र निमणकर व विलास पाडळे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पाहणी करून निवड केली होती. रोटरी प्रोबस क्लबचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कुबेर मगदूम, डॉ. प्रकाश पाटील, विजय पोवार, अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे, रामचंद्र निमणकर, सूर्यकांत बीडकर, गजानन खेतमर, हेमंत कवठे, सर्जेराव घोरपडे आदी उपस्थित होते. प्राजक्ता होगाडे यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख बाळासाहेब देवनाळ यांनी करून दिली. क्लबचे सेक्रेटरी सुनील कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98254 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..