भटक्या जनावरांच्या लसीकरणाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या जनावरांच्या लसीकरणाची मागणी
भटक्या जनावरांच्या लसीकरणाची मागणी

भटक्या जनावरांच्या लसीकरणाची मागणी

sakal_logo
By

51610
---------
भटक्या जनावरांच्या लसीकरणाची मागणी
इचलकरंजी, ता. २१ ः लंपीस्कीनच्या पार्श्वभूमीवर शहरातील भटक्या जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी आज शहर काँग्रेसतर्फे महापालिकेकडे केली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना दिले. दोन दिवसांत याबाबतची मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातील भटक्या जनावरांना लंपीस्कीनचा संसर्ग होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात भटकी जनावरे आहेत. या जनावरांचे मालक आहेत, पण त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या रोगाचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण मोहीम राबवावी व भटक्या जनावरांना विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. उपायुक्त ठेंगल यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून याबाबत चर्चा केली. दोन दिवसांत महापालिकेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येईल, असे स्पष्ट केले. आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, सतीश डाळ्या, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक राहुल खंजीरे, हारुण खलिफा, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98262 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..