कामगारांच्या देणींचीही जबाबदारी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांच्या देणींचीही जबाबदारी घ्या
कामगारांच्या देणींचीही जबाबदारी घ्या

कामगारांच्या देणींचीही जबाबदारी घ्या

sakal_logo
By

कामगारांच्या देणींचीही जबाबदारी घ्या
‘जद’चे सहकारमंत्र्यांना निवेदन; गोडसाखर चालवण्यास देण्याच्या निर्णयाचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : शासनाच्या मंत्री समितीने आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास देण्यास मान्यता दिली. या निर्णयाचे स्वागत करून तत्पूर्वी विद्यमान व निवृत्त कामगारांची देणी देण्याची जबाबदारीही घ्यावी, अशी अपेक्षा जनता दलाने व्यक्त केली आहे.
सहकारमंत्री अतुल सावे यांच्या नावे असलेले निवेदन कारखान्याच्या प्रशासकीय मंडळालाही सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, गोडसाखर दहा वर्षांकरिता भाडेतत्वावर देण्यास मान्यता दिली. त्याची निविदा प्रक्रियाही सुरू झाली. या निर्णयाचे स्वागतच आहे; परंतु कारखाना चालवण्यास देण्यापूर्वी कामगारांसह इतर देणी तातडीने दिली पाहिजेत. यापूर्वीही कारखाना दहा वर्षांसाठी दिला होता. त्याचे अनुभव पाहता कामगारांची देणी पगारातून कपात करून घेत प्रॉव्हिडंट फंड कामगारांनी घेतलेले विविध बँकांकडून वसूल करून घेऊन त्या रकमा भरलेल्या नाहीत. ग्रॅच्युईटी, रिटेन्शन या रकमाही थकीत आहेत.
निवृत्त कामगार दीड वर्ष हक्काच्या रकमेसाठी चिकाटीने, संयमाने आंदोलन करीत आहेत. त्यांची देणी देण्याबाबत उच्च न्यायालयात निर्णय झाला आहे; परंतु त्यांची देणी अजून दिलेली नाहीत. माजी आमदार श्रीपतराव शिंदे व संबंधित संचालक वेळोवेळी कामगारांच्या देणीबाबत लेखी व तोंडी मागणी करीत आहेत. असे असतानाही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता शासनानेच निवृत्त व विद्यमान कामगारांच्या देणींची जबाबदारी घ्यावी आणि लवकर कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात, अशी मागणी आहे. जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कार्याध्यक्ष उदय कदम, माजी संचालक बाळकृष्ण परीट यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98298 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..