क्रिडा स्पर्धेतील सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिडा स्पर्धेतील सहभाग
क्रिडा स्पर्धेतील सहभाग

क्रिडा स्पर्धेतील सहभाग

sakal_logo
By

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या सहभाग
खुल्या क्रीडा स्पर्धांसाठी आरोग्य तपासणी बंधनकारक करण्याची गरज

शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : जिल्ह्यात होणाऱ्या खुल्या क्रीडा स्पर्धांसाठी खुल्या गटात विविध वयोगटांतील खेळाडू सहभाग घेतात. अनेकजण जिममध्ये सराव करतात, स्पर्धेत धावतात. सांघिक सामान्यात खेळतात. सलग दोन-तीन वर्षे धावपळ, व्यायाम होतो. मोजक्या स्पर्धेत यश मिळाले की अनेक स्पर्धेत सतत सहभाग घेणे किंवा विक्रम करण्याचा प्रयत्न होतो. यातून अतिश्रम किंवा ताणातून अचानक छातीत कळ येते. पुढे आरोग्याचा गंभीर गुंता बनतो किंवा कधी जीवावर बेतले जाते. अशा स्थितीत आरोग्याची तंदुरुस्ती तज्‍ज्ञ डॉक्टरांकडून तपासूनच स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक करण्याची वेळ आली आहे.
वर्ष भरात दोन डॉक्टर, दोन अभिनेते, दोन उच्चशिक्षित तरुणांचा अति व्यायामाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या घटनामुळे शारीरिक तंदुरुस्ती न तपासताच अती व्यायाम, खेळाचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सीपीआर हृदयशस्त्रक्रिया विभागाचे हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी निरीक्षणे नोंदवली आहेत. त्या आधारे क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी आरोग्य तपासणी महत्त्‍वाची असल्याची बाब त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्राद्वारे कळवली आहे.
प्रत्येक व्यक्तीचे वय, वजन उंची व शारीरिक क्षमता याप्रमाणे किती व्यायाम करावा किंवा खेळावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे प्रमाण नगन्य आहे. अनेक तरुण किंवा प्रौढ व्यक्ती वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी जिममध्ये सतत व्यायाम करतात. शरीर कुरकूर करत नाही म्हणून व्यायामाचा जोर वाढवला जातो. यातून काही मोजक्यांच्या शरीराला अतिव्यायाम सोसत नाही. फुप्फुसावर ताण येतो. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. रक्तभिसरणाचे संतुलन बिघडते. यात ‘ब्लॉकेज’ असलेल्या, व्यसनी किंवा असंतुलित आहार घेणाऱ्या व्यक्तींना अतिव्यायाम हृदयविकारांच्या झटक्याकडे घेऊन जातो. किंवा अन्य काही गंभीर व्याधी उद्‌भवते. आरोग्याची गुंतागूंतवाढून जीवाला धोका निर्माण होतो, असेही निरीक्षण डॉ. बाफना यांनी नोंदविले.

कोट
‘मॅरेथॉन स्पर्धा, स्केटिंगपासून ते विदेशी मैदानी खेळाच्या स्पर्धांत मिळणाऱ्या यशामुळे अनेकजण भारावून जातात. कधी विक्रम नोंदवण्यासाठी सलग काही तास धावणे, जलतरण केले जाते. अशा कोणत्याही मैदानी खेळासाठी संबधित खेळाडूंचे वय, शारीरिक, मानसिक क्षमता, वजन उंची यांचा शास्त्रीय दृष्टीने डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या दाखल्यानंतरच स्‍पर्धकांना स्पर्धात प्रवेश देणे किंवा जिममध्ये व्यायाम करण्यास मान्यता देणे आवश्यक आहे. यातून जीवाचे धोके टाळण्यास मदत होईल तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
डॉ. अक्षय बाफना

चौकट
हे आवश्‍यक...
*प्रौढ खेळाडूंनी कोणत्या खेळात, किती स्पर्धेत
सहभाग घ्यावा हे डॉक्टरांकडून समजून घ्यावे
*क्रीडा स्पर्धेवेळी आधुनिक रुग्णवाहिका
व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सज्ज असावे
*रोजच्या ३० ते ४० मिनिटे तंदुरुस्त
शरीराला झेपेल असा व्यायाम करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98348 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..