भूषण महापुरे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूषण महापुरे यांचा सत्कार
भूषण महापुरे यांचा सत्कार

भूषण महापुरे यांचा सत्कार

sakal_logo
By

51711
चंदगड ः ठाणे अंमलदार भूषण महापुरे यांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व इतर सहकारी.

भूषण महापुरे यांचा सत्कार
चंदगड ः येथील पोलिस ठाण्याचे अंमलदार भूषण महापुरे यांना अपघातस्थळी सापडलेली ४८ हजार ७०० रुपयांची रक्कम त्यांनी अपघातात जखमी कृष्णा रामा कुंदेकर (रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड) यांच्या नातेवाइकांकडे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी त्यांचा सत्कार केला. सहा दिवसांपूर्वी येथील बडा मदरसाजवळ दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी अपघातात जखमींना दवाखाण्यात नेले होते, मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या महापुरे यांना त्या ठिकाणी प्लास्टिकची पिशवी आढळली. त्यामध्ये रोख ४८ हजार ७०० रुपये व बॅंकेचे पासबुक होते. जखमी कुंदेकर यांची ही रक्कम असल्याची खात्री करून त्यांनी त्यांचे नातेवाईक विलास पांडुरंग कुंदेकर यांच्याकडे परत केली. याबद्दल पोलिस निरीक्षक घोळवे यांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98367 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..