जाहीरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहीरात बातमी
जाहीरात बातमी

जाहीरात बातमी

sakal_logo
By

51746

‘डीएसटीएआय’च्या
अध्यक्षपदी एस. बी. भड

कोल्हापूर, ता. २१ : देशभरातील साखर कारखानदारी, सहवीज निर्मित, इथेनॉल आणि उपपदार्थ निर्मिती क्षेत्रात काम करणारी पुणे येथील द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडियाच्या (डीएसटीएआय) अध्यक्षपदी पुण्यातील ज्येष्ठ उद्योगपती एस. बी. भड (पुणे) यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी मावळते अध्यक्ष श्रीपाद गंगावती यांच्याकडून पदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली.
''डीएसटीएआय''च्या वार्षिक साधारण सभेत भड यांना कार्यभार स्वीकारला. भड हे पुणे येथील ''एस.एस.इंजिनिअर्स’ या साखर उद्योग उभारणी क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट इंजिनिअर, संशोधक, कल्पक डिझायनर, यशस्वी कारखानदार अशी त्यांची ख्याती आहे.
साखर कारखानदारी, सहवीज निर्मिती, इथेनॉल आणि उपपदार्थ निर्मिती क्षेत्रातील जनरल मॅनेजर, वर्क्स मॅनेजर, चीफ इंजिनिअर, अभियंते, प्रोडक्शन मॅनेजर, चीफ केमिस्ट असे तंत्रज्ञ, कार्यकारी संचालक, सीइओ,व्यवस्थापक, संशोधक, शेतीतज्ज्ञ असे संस्थेचे सभासद आहेत.
साखर आणि उपपदार्थ निर्मिती क्षेत्राला नवा आयाम व उंची देण्याचे कार्य संस्था करते. साखर निर्मिती मशिनरी कारखानदार वालचंद हिराचंद यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाल संस्थेची स्थापना झाली. संस्था जगभरात पोहोचली असून दोन हजार पेक्षा जास्त सभासद आहेत.

भड यांचे योगदान
भड हे साखर आणि उपपदार्थ मशिनरी निर्मिती क्षेत्रात ४७ वर्षे कार्यरत आहेत. साखर कारखान्यातील त्यांचे काम एक मापदंड ठरला आहे. आजपर्यंत त्यांच्या कंपनीने नवीन ४४ साखर कारखान्यांची निर्मिती व उभारणी केली आहे. ३५० पेक्षा जास्त ऊस गाळपासाठीच्या मिल्स, शंभरपेक्षा जास्त बॉयलर व २७० पेक्षा जास्त सेंट्रीफ्युगल मशीन्स कार्यरत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98448 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..