आवश्यक- दुकॉलमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- दुकॉलमी
आवश्यक- दुकॉलमी

आवश्यक- दुकॉलमी

sakal_logo
By

51762

‘जय शिवराय’ची मूर्ती
पुन्हा मूर्तिकाराकडे सुपूर्द

‘सकाळ''च्या पंचगंगा वाचवूया मोहिमेत सक्रिय पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः शिवाजी उद्यमनगरातील जय शिवराय मित्र मंडळाने यंदा राधानगरी धरण व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित देखावा साकारला होता. पर्यावरणपूरक उत्सवाची परंपरा जपताना मंडळाने मूर्तीचे पाण्यात विसर्जन न करता मूर्तिकार अमर कुंभार (कदमवाडी) यांच्याकडे पुन्हा सुपूर्द केली. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव, संदीप देसाई, प्रताप निकम, शिवाजी पाटील, शंतनू जाधव, शुभम पाटील आदी उपस्थित होते.
मंडळाने फायबरची गणेशमूर्ती सलग सहा वर्षे प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाने नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला असून, राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विविध भागांत वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना मोफत चपला, वह्या व शालेय बॅग वाटप आदी उपक्रमांवर भर दिला आहे. ‘सकाळ''च्या ‘चला, पंचगंगा वाचवूया’ मोहिमेत मंडळ सुरवातीपासून सक्रिय असून, पर्यावरणपूरक उत्सवावर मंडळाने पहिल्यापासून पुढाकार घेतला आहे. देखाव्यांतून पर्यावरणविषयक प्रबोधन करतानाच मूर्तीच्या पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा जपताना मूर्ती पुन्हा मूर्तीकाराकडे दिली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98487 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..