१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

भारतरत्न पुरस्कार आणि...
प्रा. प्रवीण दवणे यांचे ‘आशाताईंना भारतरत्न मिळावा’ (‘सकाळ’ ः ता. ९ सप्टेंबर) हे संपादकीय पानावरील मत-मतांतरे या सदरातील पत्र वाचनात आले. खरे तर ही मागणी अतिशय योग्य आहे. आशाताईंचे संगीत कला या क्षेत्रातील योगदान अतिशय परमोच्च स्थानी आहे. कोट्यवधी नव्हे, अब्जावधी लोकांच्या रसिकमनावर त्यांनी आपल्या गायनकलेने अधिराज्य गाजविले, हे सत्य रसिक जाणतात. त्यामुळे प्रा. दवणे यांची चोखंदळ रसिक म्हणून ही मागणी पूर्ण व्हावी. तसेच, संगीत कला या क्षेत्रातील सुमन कल्याणपूर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे, असे वाटते. तसेच, साहित्य, क्रीडा, संशोधन, कला, वैद्यकीय सेवा, सामाजिक सेवा या आणि अशा विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्ती या पुरस्कारापासून दूर आहेत. त्यांच्याकडेही आपले लक्ष गेले पाहिजे. अनेक दिग्गज व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
प्रा. डॉ. सदाशिव भोसले, रुकडी (जि. कोल्हापूर)

कौशल्याचा उपयोग समाजासाठी व्हावा
समाजात कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, क्रीडा, संगीत, गायन यात पारंगत असलेल्या व्यक्तीबद्दल आदर बाळगला जातो. पण, शेवटी या सर्व ‘सेलिब्रिटीं’चा समाज किती उपयोग करून घेतो, याचे उत्तरही शोधले पाहिजे. आपल्या अंगी कला असेल, काही नावीन्य असेल, तर त्यातून लोककल्याण साधले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या पराक्रमाचा किंवा क्रीडानैपुण्याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. गोरगरिबांचे दुःख दूर करण्यासाठी आपला उपयोग होणार नसेल तर काय अर्थ आहे? यातून समाजहित साधले पाहिजे. नाहीतर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून आपली कौशल्ये तळागाळापर्यंत रुजविली जावी. व समाजहित जोपासले जावे, असे वाटते.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98495 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..