वेदांता फॉक्‍सकॉनवरुन राष्‍ट्रवादीची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदांता फॉक्‍सकॉनवरुन राष्‍ट्रवादीची निदर्शने
वेदांता फॉक्‍सकॉनवरुन राष्‍ट्रवादीची निदर्शने

वेदांता फॉक्‍सकॉनवरुन राष्‍ट्रवादीची निदर्शने

sakal_logo
By

51773

वेदांता फॉक्‍सकॉनवरून राष्‍ट्रवादीची निदर्शने

कोल्‍हापूर, ता. २१ : राज्यातील तळेगाव, पुणे येथे नियोजित असणारा वेदांता-फॉक्सकॉन समूहाचा सुमारे दीड लाख कोटी गुंतवणूक व एक लाख नो‍कऱ्या असणारा महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने अचानक गुजरात राज्याकडे वळवला जाहे. यामुळे राज्यातील बेरोजगारांवर अन्याय केला असल्याचे सांगत या निर्णयाविरोधात शहर राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात महिला शहराध्यक्षा जहीदा मुजावर, युवती शहराध्यक्षा पूजा साळोंखे, विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद ऊगवे, युवकचे कैलास कांबळे, विघ्नेश आरते, शांतिजित कदम, दिग्विजय काटकर, प्रदीप मंगल, प्रवीण भोसले, सौरभ कदम, गणेश जाधव, योगेश पाटील, मखदुम नाईकवडी, अमृत सुतार, सूरज साठे, पिंटु धोंगडे, जैद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98500 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..