जिल्हा बार असोसिएशन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बार असोसिएशन बैठक
जिल्हा बार असोसिएशन बैठक

जिल्हा बार असोसिएशन बैठक

sakal_logo
By

५१८०९

कामकाजापासून राहणार ७ ऑक्टोबरला अलिप्त
खंडपीठ कृती समितीचा बैठकीत ठराव; सर्किट बेंचचा निर्णय न झाल्यास वकील परिषद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचच्या प्रश्नांची राज्य शासनाला आठवण करून देण्यासाठी ७ ऑक्टोबरला सहा जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत केला. याच दिवशी जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय मोर्चाने जाऊन निवेदन देण्याचाही निर्णय एकमताने घेतला. न्याय संकुलात खंडपीठ कृती समितीची सायंकाळी बैठक झाली.
बैठकीत महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीच्या लढ्यात सबुरी घेतली आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट नको तर मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची भेट होणे अपेक्षित आहे. बैठकीस सर्व विभागांचे सचिव उपस्थित असणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी बैठकीत तीन ठराव मांडले हे ठराव सर्वानुमते मंजूर केले. महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी सर्किट बेंचबाबत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे सर्वांनी सबुरीने घ्यावे, असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘सबुरीचा सल्ला आणखी किती वर्षे ऐकायचा. हा प्रश्न सहा जिल्ह्यातील वकीलांसह तमाम पक्षकारांचा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना पुढाकार घेण्यास भाग पाडू या.’’
यानंतर सातारा बारचे ॲड. शिवाजी मर्ढेकर, सांगली बारचे ॲड. प्रशांत जाधव, रत्नागिरीचे ॲड. दिलीप धारीया, पंढरपूर बारचे ॲड. भगवानराव मुळे, सिंधुदुर्गचे ॲड. उमेश सावंत, माळशिरसचे ॲड. नितीन खराडे, सांगोला बारचे ॲड. डी. जी. मेटकरी, सातारा बारचे ॲड. दिलीप पाटील, इस्लामपुर बारचे ॲड. दिग्वीजय पाटील, विटा बारच्या ॲड. शौर्या पवार, इचलकरंजी बारचे ॲड. विश्वास चिडमुंगे यांनी मते मांडली. बैठकीस जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे- देशमुख, ॲड. संदीप चौगुले, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. अजित मोहिते, ॲड. संपतराव पवार पाटील, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. रविंद्र जानकर, ॲड. गुरुप्रसाद माळकर, ॲड. विजय महाजन, ॲड. धनंजय पठाडे आदी उपस्थित होते.

बैठकीतील सूचना
सनदशीर मार्गाने आंदोलनातून लोकप्रतिनिधींवर दबाब आणूया
जिह्यातील लोकप्रतिनिधींची भेटी घेणे
सर्वसाधारण सभा घेवून मुख्यमंत्र्यांना ठराव पाठवणे
आझाद मैदानावर चक्र उपोषण करणे
लाक्षणिक उपोषण करणे

बैठकीतील ठराव
शासनाने सर्किट बेंचप्रश्नी दाखवलेल्या अनास्थेबाबत नाराजी
७ ऑक्टोबरला सहा जिल्ह्यातील वकील कामकाजापासून राहणार अलिप्त
त्याच दिवशी वकील मोर्चांनी जिल्हाधिकारी, तहलसीलदारांना निवेदन
ऑक्टोबरअखेर निर्णय न झाल्यास वकील परिषद घेऊन बेमुदत अलिप्त राहण्याबाबतचा निर्णय घेणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98543 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..