संजय भोसले आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय भोसले आंदोलन
संजय भोसले आंदोलन

संजय भोसले आंदोलन

sakal_logo
By

51978
संजय भोसले यांना निलंबित करा
फुले, शाहू, आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे आंदोलन

कोल्हापूर, ता. २२ ः घरफाळा घोटाळ्यातील संजय भोसले यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करत महापालिकेच्या दारात फुले, शाहू, आंबेडकरवादी पक्ष, संघटनांनी आज बोंब मारो आंदोलन सुरू केले. भोसले तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
प्रशासकांना यापूर्वी दिलेल्या निवेदनात भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी आरोप झाले आहेत. त्यांच्याबरोबर आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणाच्या दबावापोटी कारवाई होत नाही. भोसले यांना आठ दिवसांत निलंबित करावे. अन्यथा महापालिकेच्या दारात बोंब मारो ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार आठ दिवसांत कारवाई झाली नाही. त्यामुळे गुरुवारी कोल्हापूर विकास आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सेक्युलर सोशल फ्रंट, कोल्हापूर विकास प्रेमी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या दारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाने सर्व नागरिक आंदोलनस्थळी आले. दरम्यान, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी केवळ भोसलेच नव्हे तर दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, असे आंदोलनस्थळी येऊन सांगितले. पण कालावधी सांगा असा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यामुळे दररोज आंदोलन सुरूच ठेवण्याचे ठरवले. भोसले यांच्यावर जबाबदारी निश्‍चित केलेल्या अहवालाच्या दहा हजार प्रतींचे वाटप करण्यास सुरूवात केली.
राहुल कांबळे, गणेश सातपुते, भूपाल शेटे, सोमनाथ घोडेराव, डॉ. नंदकुमार गोंधळी, अनिल म्हमाने, डॉ. दयानंद ठाणेकर, सनी गोंधळी, सागर कोलप, राहुल काळे, मामा रणवरे, रेखाताई कांबळे, संतोष कांबळे, सागर कोलप, दिग्विजय कांबळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98600 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..