वारकरी संप्रदायात माणूस घडतो : चैतन्य महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी संप्रदायात माणूस घडतो : चैतन्य महाराज
वारकरी संप्रदायात माणूस घडतो : चैतन्य महाराज

वारकरी संप्रदायात माणूस घडतो : चैतन्य महाराज

sakal_logo
By

51869
मुत्नाळ : कीर्तनाद्वारे भाविकांचे प्रबोधन करताना युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर.

वारकरी संप्रदायात माणूस
घडतो : चैतन्य महाराज
गडहिंग्लज : आजच्या भरकटलेल्या तरुणाईला रुळावर आणण्यासाठी संत साहित्याची नितांत गरज आहे. आज माणसे बदलली नाहीत, त्यांची बुद्धी बदलली आहे. बुद्धीचा बदल सकारात्मकतेकडे नेणे सर्वांचे कर्तव्य आहे. माणसाला माणूस बनवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात असल्याचे मत युवा कीर्तनकार चैतन्य महाराज-वाडेकर यांनी केले. मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील कै. लक्ष्मीबाई नवलाज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तनावेळी ते बोलत होते. अभिनव मंजुनाथ महास्वामींच्या सान्निध्यात एस. डी. हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. एल. टी. नवलाज यांनी स्वागत केले. या वेळी सदाभाऊ खोत, शौमिका महाडिक, शिवाजीराव पाटील, हेमंत कोलेकर, नाथाजी पाटील, प्रा. अनिल कुराडे, पृथ्वीसिंह यादव, अनिरुद्ध रेडेकर, जयश्री तेली यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. रावसाहेब मुरगी यांनी सूत्रसंचालन केले. केंप्पाना मुगळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98657 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..