राजेश क्षीरसागर - जिल्हाधिकारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश क्षीरसागर - जिल्हाधिकारी बैठक
राजेश क्षीरसागर - जिल्हाधिकारी बैठक

राजेश क्षीरसागर - जिल्हाधिकारी बैठक

sakal_logo
By

५१९१९


प्रस्तावित आराखडाप्रश्‍नी मंत्रालयात बैठक घेऊ
राजेश क्षीरसागर; देवस्थानच्या प्रलंबित कामांसह नवरात्र उत्सवाच्या तयारीचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : नवरात्रात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा द्या, तक्रार येऊ देऊ नये, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्याच्या प्रती सादर करा. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मंत्रालयस्तरावर बैठक घेऊ, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
सुरुवातीस क्षीरसागर यांनी नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. यामध्ये देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे यांनी भाविकांच्या वाहनासाठी सुमारे ११ ठिकाणी पार्किंगसह, सुरक्षेसाठी १०० सीसीटीव्ही, मोफत दर्शनासह रोज हजार ‘पेड’ दर्शन पासची व्यवस्था केल्याचे सांगितले. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी यासह मंदिर परिसरात भाविकांना सोयी-सुविधा देण्याकरिता आवश्यक विकासकामांचे आराखडे नियोजन विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर केले आहेत. दर्शन मंडपासाठी तीन जागांची चाचपणी सुरू असून, संबंधित विभागांशी चर्चा सुरू आहे. यासह मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांशीही चर्चा करून जागेचा विषय मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
श्री. क्षीरसागर यांनी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांनाही सामावून घ्यावे. मंदिर परिसरात होणाऱ्या चोऱ्या, पाकीटमारी आदींबाबत रेकॉर्डवरील सराईत गुंडांना ताब्यात घेण्याबाबत पोलिस प्रशासनास सूचना कराव्यात. फिरस्त्यांकडून भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासह देवस्थानच्या प्रलंबित विकासकामांसह, प्रस्तावित आणि आवश्यक असलेल्या आराखड्यांच्या व प्रस्तावांच्या प्रती सादर कराव्यात. देवस्थान समितीस आवश्यक निधीबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे सांगितले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उपअभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, वास्तुविशारद मनोज पंडित, रणजित निकम, ठेकेदार संकल्प पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98705 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..