राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण
राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण

राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण

sakal_logo
By

राधानगरी, दाजीपूर आराखड्याचे सादरीकरण
इको टुरिझमला प्राधान्य; झुलता पूल, उद्यानासह म्युझिक शोचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २२ : राधानगरी धरण परिसरासह दाजीपूर अभयारण्य परिसरात इको टुरिझम विकसित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्‍न सुरू आहेत. यामध्ये निसर्गाशी अनुरुप पर्यटन विकासासाठी मागील दहा, पंधरा वर्षांत प्रयत्‍न सुरू आहेत. राधानगरी धरणस्‍थळाचा विकास करण्यासाठीही २७ कोटींच्या आराखड्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादरीकरण केले. यामध्ये धरणस्‍थळ परिसरात झुलता पूल, धरणाची प्रतिकृती यांसह अनेक बाबींचा समावेश आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी देत असतानाच शहरातील लोकांना पर्यावरण संतुलित पर्यटन करण्याची उपलब्‍धी निर्माण होणार आहे.
राधानगरी, दाजीपूर अभयारण्य परिसरात विकास प्रकल्‍पांवर अनेक निर्बंध आले आहेत. याचा परिणाम येथील रोजगारावर झाला आहे. शेतीसह इतर उद्योग करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे या निर्बंधांचा विचार करून, पर्यावरणाला धोका होणार नाही, या पद्धतीने दाजीपूर व राधानगरी धरण परिसराचा विकास करण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक व पर्यटकांसाठी उपयुक्‍त प्रकल्‍प घेण्यात येत आहे. राधानगरी हा पर्यटन तालुका असल्याने त्याअनुषंगाने सोयीसुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाला २७ कोटींचा प्रस्‍ताव सादर केला आहे. यामध्ये माहिती केंद्रापासून ते झुलत्या पुलापर्यंत आणि उद्यांनापासून ते कारंज्या आणि लाईट, म्युझिक शो पर्यंत अनेक घटकांचा समावेश आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास धरण परिसराचे संपूर्ण चित्रच बदलल्याचे पाहायला मिळणार आहे.


कोट
राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांसाठी दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्यामुळेच धरण परिसरात राजर्षी शाहू महाराजांचे भव्यदिव्य व प्रेरणादायी स्‍मृति केंद्र उभारले आहे. या सर्व परिसराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार केला आहे. धरण परिसरासह दाजीपूर अभयारण्यातही इको टुरिझम प्रकल्‍प राबवला जात आहे.
प्रकाश आबिटकर, आमदार

राधानगरी धरण परिसराचा विकास करण्यासाठी जिल्‍हा परिषदेतून पहिल्यांदा निधी लावला. पंधरा वर्षांपासून टप्‍प्याटप्‍प्याने या परिसराचा विकास होत आहे. दरवर्षी लाखो लोक भेट देऊन शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेत आहेत. महाराजांच्या कार्याची आणखी माहिती देणारे उपक्रम निर्माण केले जाणार आहेत. यासाठी पर्यटन विभागाकडे आराखडाही सादर केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.
- अभिजित तायशेटे, संचालक गोकुळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98774 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..