बाबू फरास शोकसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबू फरास शोकसभा
बाबू फरास शोकसभा

बाबू फरास शोकसभा

sakal_logo
By

51968
लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारी संस्था उभारावी
माजी महापौर बाबू फरास यांना आदरांजली; महापालिका चौकात सर्वपक्षीय शोकसभा

कोल्हापूर, ता. २२ ः प्रशासनाला सोबत घेऊन जनतेची विकासकामे करणाऱ्या माजी महापौर बाबू फरास यांच्या नावाने लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारी संस्था उभी करावी. तेच उचित स्मारक ठरेल, असा सूर महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आज झालेल्या शोकसभेत व्यक्त करण्यात आला. ‘‘बाबू फरास म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते’’, अशी आदरांजली आमदार हसन मुश्रीफ यांनी वाहिली.
सर्वपक्षीय शोकसभेत फरास यांच्यासह महापालिकेचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी एस. वाय. सरनाईक व आपत्ती व्यवस्थापनचे जवान राजशेखर मोरे यांनाही आदरांजली वाहण्यात आली. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेने समाजाला वाहून घेतलेले त्यांचे घराणे होते. हजरजबाबी व्यक्तिमत्त्वाचे ते कसलेले जनताभिमुख कार्यकर्ते होते.’’ आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘‘फरास यांनी शहरातील बहुजनांचे नेतृत्व केले. सामान्य जनतेला आपलेसे केल्यामुळे जनतेच्या हृदयात त्यांना स्थान मिळाले.’’ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असल्याचे सांगितले, तर माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे यांनी ते छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होते. अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. दिलीप पवार म्हणाले, ‘‘नवीन पिढीतील नगरसेवक होणाऱ्यांनी त्यांचे कार्य समजून घ्यावे. ते कायम विचारांशी एकनिष्ठ राहिले.’’ अशोक पोवार म्हणाले, ‘‘शासनाच्या मदतीने त्यांच्या नावाने जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारी एखादी संस्था उभी करावी.’’ गणी आजरेकर, कादर मलबारी यांनी फरास यांनी मुस्लिम बोर्डिंगचा आर्थिक कणा उभा करून दिल्याची भावना मांडली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, ‘‘दूरदृष्टी ठेवून त्यांनी शहरातील कामे केली. काँग्रेस पक्षाशी ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.’’ शिवसेनेचे सुनील मोदी व महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, केएमटीचे कामगार नेते निशिकांत सरनाईक यांनी फरास यांच्यामुळे केएमटीला ऊर्जितावस्था आली. माजी नगरसेवक अशोक भंडारे, शेकापचे संभाजीराव जगदाळे, जयकुमार शिंदे, फारूक पठाण, फारूक कुरेशी, आप्पासाहेब साळोखे यांची भाषणे झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शोकसंदेशाचे वाचन केले. माजी आमदार के. पी. पाटील, निलोफर आजरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, अर्जुन माने, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर उपस्थित होते.

चौकट
जवान राजशेखर मोरेंच्या
कुटुंबीयांना लाखाची मदत
आपत्ती निवारण विभागाचे जवान राजशेखर मोरे यांचा बीड येथे मदतकार्य करताना बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनने एक लाख रुपयांची मदत देत असल्याची घोषणा आमदार मुश्रीफ यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98796 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..