पतसंस्था फेडरेशन पतसंस्था फेडरेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतसंस्था फेडरेशन
पतसंस्था फेडरेशन
पतसंस्था फेडरेशन पतसंस्था फेडरेशन

पतसंस्था फेडरेशन पतसंस्था फेडरेशन

sakal_logo
By

51952

नागरी बँकांतील पतसंस्थेच्या ठेवी मिळाव्यात
जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे माजी मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन

कोल्हापूर, ता. २२ ः सर्वसामान्य लोकांच्या ठेवी असणाऱ्या पतसंस्थांतील ठेवी बंद पडलेल्या नागरी बँकांत अडकून पडल्या असून, या ठेवी पतसंस्थांना मिळाव्यात किंवा संबंधित बँकांची कर्जे पतसंस्थांच्या नावांवर करावीत या मागणीचे निवेदन जिल्हा पतसंस्था फेडरेशने माजी केंद्रीय मंत्री व सहकार विभागाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांना दिले.
राज्यातील अनेक पतसंस्थांनी आपल्या ठेवी मोठ्या प्रमाणात नागरी बँकांत ठेवल्या आहेत. पण, काही बँका अडचणीत आल्यामुळे पसंस्थांच्या ठेवी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटी कार्पोरेशन मार्फत पतसंस्थांना इतर ग्राहकांप्रमाणे एक लाख रुपये मिळाले आहेत. त्यानंतर बँकांची वसूल झालेली रक्कम सदर विमा कंपनीस परत आदा केली जाते. त्यामुळे एक लाखाव्यतिरिक्त ठेवीची रक्कम कोणालाही मिळालेली नाही. त्याऐवजी वसूल झालेली रक्कम प्राधान्याने पतसंस्था व सामान्य ठेवीदारांना द्यावी व शेवटी डिपॉझिट कार्पोरेशन द्यावी. जवळपास वीस वर्षांपासून पतसंस्थांची ८०० कोटी रुपयांची ठेव बँकेत अडकली आहे. म्हणून ही रक्कम प्राधान्याने मिळावी किंवा त्यासाठी बँकांकडील कर्जे पतसंस्थांकडे वर्ग करण्यासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
शिष्टमंडळात फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील, कार्याध्यक्ष अनिल पाटील, व्यवस्थापक दीपक पाटील, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक वसंतराव चव्हाण आदींचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98802 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..